शिरपूर / शिंदखेडा : जिल्ह्यात शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीमध्ये मंगळवार पासून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिला दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ९ मार्च शेवटची तारीख आहे.शिंदखेडा तालुका - तालुक्यातील आच्छी, चिलाणे, दभाषी, दाऊळ, डोंगरगाव, मालपूर, मेथी, पिंपरखेडा, विखरण या ९ ग्रामपंचायतीमध्ये मंगळवारपासून निवडणूक प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. याठिकाणी प्रथमच लोकनियुक्त सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे या गावांमध्ये मतदानासंदर्भात विशेष उत्सुकता आहे. लोकनियुक्त सरपंच निवडीमुळे आता सर्वच पक्षातील नेतेमंडळी ग्रामपंचायत निवडणुकीकडे विशेष लक्ष देत असतांना दिसतात. निवडणुकीत पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.शिरपूर तालुका - तालुक्यातील अंजदे खुर्द, नवे भामपूर, टेंभे बु., सुभाषनगर, आढे, जैतपूर आणि भरवाडे ग्रामपंचायतीत निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही.अर्ज दाखल करण्याची मुदत - ९ मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर ११ मार्चला अर्जांची छाननी, १३ मार्चपर्यंत माघारीची मुदत, त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. तर २४ मार्चला मतदान होईल आणि दुसऱ्या दिवशी तहसील कार्यालयात मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.
१७ ग्रामपंचायतीमध्ये पहिला दिवस निरंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 10:42 PM