लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील भारतीय जनता युवा मोर्चातर्फे सीएम चषक सामुहिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले़ त्यात आदिवासी नृत्य सादर करुन चंचल ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला़२ रोजी येथील राजपूत मंगल कार्यालयात लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आली़ त्यात ज्या सहभागी संघाने आॅनलाईन नोंदणी केली होती अशांनाच सहभागी होता आले़ त्यामुळे ऐनवेळी आलेल्या ११ पैकी फक्त ६ संघानाच नृत्य सादर करता आले़ कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले़ यावेळी तालुका प्रभारी डॉ़जितेंद्र ठाकूर, नगरसेवक हेमंत पाटील, नगरसेवक किरण दलाल, हेमराज राजपूत, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष मुन्ना राजपूत, रोहित शेटे, आबा धाकड, महेंद्र पाटील, शाम पाटील, गणेश माळी आदी उपस्थित होते़लोकनृत्य स्पर्धेत ६ संघ सहभागी झाले होते़ त्यात चंचल ग्रुपने आदिवासी नृत्य सादर करुन प्रथम क्रमांक, प्रांजल गु्रपने पिंगा नृत्य सादर करुन द्वितीय तर सेजल गु्रपने तृतीय क्रमांक पटकाविला. भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील यांच्याहस्ते विजेत्या प्रथम ग्रुपला रोख ३ हजार ५१, द्वितीय ग्रुपला २ हजार ५१ व तृतीय क्रमांक पटकाविणाºया ग्रुपला १ हजार ५१ रूपयांचे पारितोषिक देण्यात आले़ प्रथम क्रमांक पटकाविणाºया चंचल ग्रुपची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले़ परिक्षक म्हणून सारीका रूद्रे व भारत सैंदाणे यांनी काम पाहिले़ लोकनृत्य स्पर्धेसाठी जितु मराठे, सुनिल जाधव, योगेश पाटील, रॉकी पवार, विकास माळी, अतुल राजपूत, उमेश धनगर, सोमेश पाटील, पंकज तुपे, सुमित देवरे यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेत आदिवासी नृत्याला प्रथम क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:56 PM