पिंपळनेर : सदगुरू श्री खंडोजी महाराज यांची १९१ वी पुण्यतिथी व नामसप्ताह महोत्सव निमित्ताने सोमवार ९ सप्टेंबर रोजी येथील खंडोजी महाराज क्रीडा संकुलावर भव्य आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नृत्य स्पर्धेत होळी नृत्य सादर करणाºया नर्मदानगर, तळोदा संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाला २१ हजारांचे बक्षिस प्रदान करण्यात आले. या नृत्य स्पर्धेत धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांसह गुजरात राज्यातून एकूण १८ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उदघाटन हभप योगेश्वर महाराज देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अॅड.संभाजीराव पगारे, सरपंच साहेबराव देशमुख, मोहन सूर्यवंशी, तुळशीराम गावित, डॉ. जितेश चौरे, मंजुळा गावित, हभप सर्वेश्वरदास महाराज, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, उपनिरीक्षक लोकेश पवार, भूषण हंडोरे, प्रताप पाटील, उपसरपंच संजय जगताप, तुकाराम बहीरम, कैलास सूर्यवंशी, सचिन धामणे, रवींद्र कोतकर, गणेश कोतकर, नितीन कोतकर, रत्नाकर बाविस्कर, उल्हास बागुल आदी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी धुळे, नंदुरबार व गुजरात राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या विविध १८ संघांनी स्पर्धेत पारंपरिक नृत्यांनी चांगलाच रंग भरला. या संघांनी आदिवासी नृत्यांसह वाद्य वाजवत उपस्थित हजारो श्रोत्यांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी त्यांना बक्षिसांसह देणगी देण्यात आली. उपस्थित नागरिकांना विविध आदिवासी नृत्यकला प्रत्यक्ष पाहण्याचा, अनुभवण्याचा आनंद लुटला. यात नंदी नृत्य, टिपरी नृत्य, पारंपारिक नृत्य सादर करण्यात आले यावेळी होळी नृत्य सादर करणाºया नर्मदा नगर, तळोदा संघाला प्रथम क्रमांक मिळाला. त्यांना २१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. द्वितीय क्रमांक ठाकूर नृत्य सादर करणाºया सुरगाणा संघाला ११ हजार रुपये मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तृतीय क्रमांक डांगी नृत्य सादर करणाºया धवलीदोंड संघाला सात हजार रुपये मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ टिपरी नृत्य भोयाचापाडा पाच हजार रुपये प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह, नंदी नृत्य जैतापूर सटाणा तीन हजार रुपये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, भोंगºया नृत्य, कोठबांधणी एक हजार रुपये प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष महाजन यांनी केले.स्पर्धेचे काटेकोर परीक्षण या भव्य स्पर्धेचे परीक्षण विजय खैरनार, रोहिदास कोकणी, डॉ.जी.एस. ठाकरे यांनी अत्यंत काटेकोरपणे केले. बक्षिसांचे प्रायोजक हे उपस्थित मान्यवर हे होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ.मिलिंद कोतकर, देवेंद्र पाटील, योगेश कोठावदे, प्रतिक कोतकर, राजेंद्र पेंढारकर, माधव पवार, आकाश ढोले, सुभाष महाजन नितीन लोखंडे, दयाराम सोनवणे, कैलास सूर्यवंशी, प्रमोद जोशी, जितेंद्र कोतकर, हिंमत जगताप, हिरालाल शिरसाठ, ईश्वर ठाकरे, जगदीश गांगुर्डे परिश्रम घेतले.
नर्मदानगर संघाला प्रथम क्रमांकाचे बक्षिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:09 AM