लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : गावातील छत्रपती शिवाजी महाराज व ग्रामदेवता भवानी माता मंदिर चौकात रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनला लागलेल्या गळतीचे पाणी आणि परिसरातील तुंबलेल्या गटारीचे पाणी वाहत येऊन या खड्डयामध्ये साचले आहे. त्यामुळे चौकात चिखल झाले आहे. या पाण्यात उत्पन्न झालेले मासे पकडण्याचे आंदोलन करुन संतप्त ग्रामस्थांनी आपली नाराजी व्यक्त केली. कारण रस्त्यावरील खड्डे बुजण्याची आणि गटारी स्वच्छ करण्याची मागणी करुनही याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. गावातील या चौकातील रस्त्याची गेल्या वर्षभरापासून दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे झाले आहे. या चौकातूनच गावातील जिल्हा परिषद व खाजगी माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयमध्ये विद्यार्थी जात असतात. कापडण्यासह, धनुर, लोनकुटे,तामसवाडी ,न्याहळोद ,कौठळ ,बिलाडी, धमाने सर्व गावातील प्रवासी याच रस्त्यावरुन नेहमी ये जा करत असतात. बाहेरगावावरून कापडणे गावात पाहुणेमंडळी आल्यावर या भवानी चौकातच प्रथमत: उतरतात उतरल्याबरोबर सर्वांनाच घाण चिखलयुक्त रोडवरून मार्गस्थ व्हावे लागते. याठिकाणी अनेकदा मोटारसायकलचे छोटे मोठे अपघात होत असतात. रस्त्याच्या दुरुस्तीची आणि पाण्याच्या गळती थांबविण्याचे तसेच तुंबलेल्या गटारी स्वच्छ करण्याची वारंवार मागणी करुनही ग्रामपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा निषेध म्हणून रविवारी संतप्त ग्रामस्थांनी हे अभिनव आंदोलन केले. या आंदोलनात हनुमंत शामराव पाटील, भानुदास पाटील, रोहिदास चौधरी, गणेश गुरव, जगदीश बोरसे, शामराव पाटील, गणेश पाटील, शानाभाऊ माऊली ,गोपाल माळी , समाधान बोरसे ,ज्ञानेश्वर माळी ,दत्तात्रय पाटील, भुषण पाटील, भरत पाटील, दिनेश खलाने ,मोतीलाल माळी ,येडू महाजन, रावसाहेब पाटील आंदोलनात सहभागी होते.
खड्डयातील तुंबलेल्या पाण्यात मासे पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:48 AM