शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

पुत्राची भागवत कथा ऐकून परतताना मातेसह पाच ठार; धुळ्यात भरधाव पिकअपची व्हॅनला धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 05:55 IST

मृतांमध्ये कथाकारांच्या आईचा समावेश आहे, तर चार जखमींवर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिंदखेडा (जि. धुळे)  : तालुक्यातील वारूड येथे आयोजित भागवत कथेला कथाकारासोबत असलेले त्यांचे सोबती व्हॅनमधून शिंदखेडा येथे परतत असताना होळ-दसवेल मार्गावर रात्री दीड ते दोन वाजेदरम्यान समोरून भरधाव येणाऱ्या मालवाहतूक पिकअपने जोरदार धडक दिली. या अपघातात व्हॅनमधील पाच जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये कथाकारांच्या आईचा समावेश आहे, तर चार जखमींवर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिंदखेडा  येथील  दीनानाथ देसले  हे संगीतमय भागवत कथा करतात. त्यांची शनिवारी वारूड (ता. शिंदखेडा) येथे गणेश मंडळाने एक दिवसाची भागवत कथा ठेवली होती.  त्यांच्यासोबत भजन गायक, वादक, हार्मोनियमवादक ही साथ देणारी मंडळीदेखील होती. कथा संपल्यावर ही मंडळी व्हॅनमधून परत शिंदखेडाकडे निघाली. त्यावेळी हा अपघात झाला.

मयुरी पितांबर परदेशी (वय २७),  विशाखा (वृषाली) आप्पा माळी (१७),  मंगलाबाई लोटन देसले  (६०, सर्व रा. शिंदखेडा), सुनील दंगल कोळी (३२, रा. परसामळ), व्हॅनचालक जयेश गुलाब पाटील बोरसे (२३) अशी मृतांची नावे आहेत. मृत मंगलाबाई देसले या भागवत कथाकार दीनानाथ देसले यांच्या मातोश्री होत.

टॅग्स :Accidentअपघात