लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिवजयंतीचे औचित्यसाधून शहरात बहुसंख्य तरुण दुचाकीने रॅली काढत जनजागृती करत आहेत़ आग्रा रोडवरुन निघालेल्या दुचाकीस्वारांच्या रॅलीत सहभागी तरुणांकडून आझादनगर पोलिसांनी ५ तलवारी जप्त केल्या़ ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली़ शिवजयंतीचे औचित्यसाधून सोमवारी सकाळपासून शहरातील विविध मार्गावर दुचाकीस्वार एकत्र येऊन रॅली काढत आहेत़ ‘जय शिवाजी जय भवानी’चा जयघोष केला जात होता़ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आहे़ दुपारी आग्रा रोड वर दुचाकीस्वारांची रॅली फिरत असताना काही तरुणांजवळ तलवारी आढळून आल्या़ तलवारीच्या जोरावर हे तरुण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते़ ही बाब पोलिसांच्या निदर्शनात आली़ लागलीच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार आणि पोलिसांच्या पथकांने या तरुणाला हेरले़ त्यांच्याकडून ५ तलवारी जप्त करण्यात आल्या असल्या तरी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही असे पोलिसांनी सांगितले़
दुचाकी रॅलीतून पाच तलवारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 10:56 AM
आग्रा रोडवरील घटना : आझादनगर पोलिसांची कारवाई
ठळक मुद्देआझादनगर पोलिसांनी ५ तलवारी जप्त केल्याशिवजयंतीनिमित्त आयोजित दुचाकी रॅलीतील घटनासंबंधितांवर लवकरच कारवाई होण्याचे संकेत