शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या जुन्या आग्रारोडवरील पाच कंदिल चौकात अनेक हातगाडीधारकांनी रस्त्यावर जणू ताबाच मिळविलेला आहे. रस्ता प्रशस्त आहे, मात्र फळ विक्रेते, किरकोळ वस्तू विक्रेते मनाला पटेल त्याठिकाणी हातगाड्या लावत असल्याने, रस्ता अरूंद झालेला आहे. या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झालेले आहे. येथील विक्रेत्यांचा व्यवसाय हा उद्देश बाजुला राहून सर्वसामान्यांची अडवणूक करणे हाच उद्देश दिसून येतो. शहरात अनेक पोलीस अधिकारी येवून गेले. मात्र त्यांनाही या भागातील वाहतुकीची प्रश्न आजपर्यंत सोडविता आलेला नाही. अनेक विक्रेते रस्त्यावरच गाड्या लावत असल्याने बºयाचदा वाद होतात. त्यामुळे सामाजिक तेढही निर्माण होत असते. या परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे. शहरवासियांनीच या भागात वस्तू घेण्याचे जायाचे टाळले तर काही प्रमाणात या भागातील प्रश्नही सुटू शकणार आहे. त्याचबरोबर शहराचा विस्तार झपाट्याने वाढलेला आहे. अनेक व्यापारी संकुले अस्तित्वात आलेली आहेत. मात्र शहरात कुठेही पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे वाहनधारक रस्त्यालगत वाटेल त्या ठिकाणी वाहने उभी करतात. याचा परिणाम वाहतुकीवर होतो. रस्त्यावरच वाहने उभी केल्याने, मोठी वाहने नेतांना अडचण निर्माण होते. अशातच लहान वाहनांना मोठ्या वाहनांचा धक्का लागल्यास वाद होतात. प्रसंगी मारामाºयाही होतात. शहरातील पार्किंगचा प्रश्न महानगरपालिकेने सोडवायला पाहिजे. प्रत्येक व्यापारी संकुलात वाहन पार्किंगची व्यवस्था असावी. रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करणाºयांविरूद्ध वाहतूक शाखेने कारवाई केली पहिजे. - सुहास चौक, ज्येष्ठ नागरिक धुळे.
पाच कंदिल चौकातील समस्या सुटावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 10:58 AM