धुळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मध्यवर्ती पुतळ्यावर विमानातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे़ सामूहिक बुध्दवंदना, रक्तदान शिबिर, अन्नदान व भीमगीतांचे आयोजन करण्यात आले आहे़भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती धुळे जिल्हा मध्यवर्ती समितीच्यावतीने सकाळी ९ वाजेला शहरातील पूणाकृती पुतळ्याजवळ सामुदायिक बुद्ध वंदना तसेच क्यूमाईन क्लब, टेक्निकल हायस्कुल जिल्हा कारागृहा समोर रात्री ८ वाजेला भीम गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समितीचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम गरुड यांच्यावतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी दिपक गवळे, अनिरुद्ध अमृतसागर, साहेबराव पाईकराव, दिपक देवरे, राजाभाऊ उमाळे, राजु पवार,रत्नशील सोनवणे, विक्रम मोरे,बंडू गांगुर्डे, विनायक अहिरे, अयुब खाटीक, अमीन अन्सारी, कैलास गवळी, आदित्य बोरसे, सागर चव्हाण, राहुल गरुड, मानव गरुड आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.भीम गीतांचा कार्यक्रमसमता संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या विद्यमाने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२८ व्या संयुक्त जयंती उत्सव समितीच्यावतीने सायंकाळी ७ वाजेला पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ गायक प्रकाश नाथ पाटणकर नागपूर यांचा बुद्ध व भीमगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विमानातून होणार पुष्पवृष्टीशहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यावर विमानाद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे़ या उपक्रमासाठी किशोर महाले यांचे सहकार्य मिळत असून अनोखी उपक्रमाची संकल्पना अॅड़भैय्यासाहेब झाल्टे, अॅड़ जितेंद्र निळे व अविनाश थोरात यांनी मांडली आहे़ यशस्वीतेसाठी संजय चव्हाण, मुन्ना पाटोळे, मिलिंद खैरनार, छोटू जवरास, छोटू खरात, प्रशांत वाघ, आनंद गांगुर्डे, नितीन पाटील, निनाद पाटील आदी परिश्रम घेत आहेत़
महामानवाच्या पुतळ्यावर विमानाद्वारे होणार पुष्पवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:30 PM