आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात असलेली गुरांची संख्या लक्षात घेता नोव्हेंबर २०१८ ते जुलै २०१९ अखेरपर्यंत ५ लाख ९४ हजार ३५१ मेट्रीक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. मात्र खरीप, रब्बी हंगाम, पशुसंवर्धन विभाग व डीपीसी निधीतून उपलब्ध होणारा एकूण चारा हा ६ लाख ८५ हजार ११९ मेट्रीक टन एवढा असेल. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई भासणार नाही, अशी स्थिती आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी असमाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्याला दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागतोय. कमी पावसाअभावी पाणी टंचाई सोबतच चारा टंचाई देखील भासण्याची दाट शक्यता आहे.खरीप हंगामात झालेल्या पेरणीमुळे काही प्रमाणात चारा उपलब्ध झाला होता. मात्र अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने, रब्बीच्या पेरणीवर त्याचा परिणाम झालेला आहे. मात्र जिल्ह्यात जेवढ्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, त्यातून काही प्रमाणात चारा उपलब्ध होऊ शकतो.जिल्ह्यात जनावरांची संख्या ६ लाख ९९ हजार ६९४ एवढी आहे. त्यात नोव्हेंबर १८ ते जुलै १९ अखेरपर्यंत ५ लाख ९४ हजार ३५१ मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे. तर खरीप हंगामातील पिकापासून ३ लाख २७ हजार ८१५ मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे. या शिवाय २०१८ मधील रब्बी पिकांपासून ८७ हजार ७९१ मेट्रीक टन चारा उपलब्ध होणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून ८९ हजार ५१३ व डीपीसी निधीतून १ लाख ८० हजार मेट्रीक टन चारा उपलब्ध होणार आहे. असा एकूण ६ लाख ८५ हजार ११९ मेट्रीक टन चारा जुलै १९ अखेरपर्यंत उपलब्ध असेल असेही सांगण्यात आले.मका, ज्वारी बियाणे वाटपटंचाईच्या परिस्थितीत चाºयाचे उत्पादन वाढवून टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना ज्वारी व मक्याचे बियाणे वाटप करण्यात आले. यात मका ३६४.२२ क्विंटल तर ज्वारीचे बियाणे ४४५.५६ असे एकूण ८०९.७८ क्विंटल बियाण्याचे वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
धुळे जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 1:46 PM
पशुपालकांना दिलासा : पशुसंवर्धन व कृषी विभागाचे नियोजन
ठळक मुद्देजिल्ह्यात ७ लाख गुरेजुलै अखेरपर्यंत ५ लाख ९४ हजार ३५१ मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे. कृषी व पशुसंवर्धन विभागाचे नियोजन