आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत पदस्थापना करतांना पती-पत्नी एकत्रिकरण अंतर्गत झालेला अन्याय दूर करून न्याय मिळण्यासाठी शिक्षक भास्कर अमृतसागर यांनी शिक्षक दिनापासून कंदिल लावून बिºहाड आंदोलन सुरू केले होते. मात्र सीईओंनी दिलेल्या तंबीमुळे दुसºया दिवशी त्यांना आंदोलन मागे घेवून शाळेवर हजर व्हावे लागल्याची चर्चा आहे.पती-पत्नी दोघेही ३० कि.मी.च्या आत कार्यरत असतांना संवर्ग ५च्या बदली प्रक्रियेत भास्कर अमृतसागर यांना चिंचखेडे (ता. साक्री) तर त्यांची पत्नी कल्पना झाल्टे यांना बोरकुंड (ता. धुळे) येथे पदस्थापित करण्यात आले. पती-पत्नी एकत्रीकरणात अन्याय होऊ नये असे शासन आदेश आहेत. मात्र अमृतसागर दाम्पत्याला पदस्थापित केलेल्या गावांमध्ये ७० कि.मी.पेक्षा जास्त अंतर आहे. न्याय मिळावा यासाठी त्यांनी शिक्षक दिनापासूनच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ कंदिल लावून बिºहाड आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन लक्षवेधक ठरलेले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुसºया दिवशीही ते शिक्षक आंदोलनाला बसलेले होते. परंतु मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी त्यांना कर्मचाºयांमार्फत आपल्या दालनात बोलावून घेतले. सीईओंनी न्याय देण्याऐवजी शिक्षकालाच निलंबित करण्याची भाषा वापरली. आंदोलन मागे घेऊन तत्काळ शाळेवर हजर होऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. सीईओंच्या आदेशानंतर भास्कर अमृतसागर यांनी चिंचखेड येथील शाळेवर हजर झाले.दरम्यान या बाबत भास्कर अमृतसागर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या सूचनेवरून शाळेवर हजर झालो आहे.
धुळे जिल्हा परिषदेच्या सीईओंनी दिलेल्या तंबीनंतर शिक्षकाचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 3:48 PM
न्यायासाठी शिक्षक दिनापासून जि.प.समोर सुरू केले होते बिºहाड आंदोलन
ठळक मुद्देशिक्षक दिनापासून सुरू होते शिक्षकाचे आंदोलनसीईओंनी शिक्षकाला दिली तंबीशिक्षकाला न्याय मिळालाच नाही