लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्वस्त धान्य दुकानांवर धान्य खरेदीसाठी जाणाºया नागरिकांना आणि महिलांना कोरोना विषाणू संसर्गाचा विसर पडल्याचे दिसते़ कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी नागरीक करीत नसल्याने चिंता वाढली आहे़पुरवठा विभागामार्फत सध्या प्राधान्य कुटूंबात नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात धान्य वितरण सुरु आहे़ त्यामुळे शहरासह जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांवर नागरीकांची गर्दी होत आहे़ ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकार अंमलबजावणी होताना दिसत आहे़ नागरीकांनी सुक्षीत अंतर ठेवल्याचे चित्र आहे़याउलट शहरात मात्र कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य नसल्याचे जाणवत आहे़ स्वस्त धान्य दुकानांवर पुरुषांच्या तुलनेत महिलांची गर्दी अधिक आहे़ धान्य घेण्यासाठी पिशव्या रांगेत ठेवून महिला सावलीच्या ठिकाणी एकत्र बसताना दिसत आहेत़ यावेळी सुरक्षीत अंतर ठेवले जात नाही़ काही महिलांनी मास्क वापरणे टाळल्याचे दिसत आहे़ धान्य खरेदीसाठी आलेल्या पुरुषांनी मास्क लावल्याचे दिसले: परंतु त्यांच्याकडून सुरक्षीत अंतर ठेवले जात नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती आहे़धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे़ सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पन्नाशीच्या पार गेली आहे़ त्यातील सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़ उर्वरीत २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ अनेक संशयित रुग्णांच्या अहवालाची अजुनही प्रतिक्षा आहे़ कोरोनाच्या बाबतीत भयावह परिस्थिती असताना प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष होत आहे़ रेशन दुकानदारांचेही कुणी ऐकत नाही़ धुळे शहरात स्वस्त धान्य दुकानांवर होणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे़
धान्य घेणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:26 PM