धुळे : व्हॉट्सअप ग्रुपवर अश्लील संदेश टाकून बदनामी करणारा देवा सोनार याच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी आणि कुटुंबीयांना संरक्षण द्यावे या मागणीचे निवेदन सोमवारी पोलीस उपअधीक्षक हिमंत जाधव यांना देण्यात आले. माजी महापौर व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा जयश्री अहिरराव आणि राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्या प}ी भारती मोरे यांनी हे निवेदन दिले. त्यानंतर देवा सोनारवर गुन्हा दाखल होत नाही तोवर राष्ट्रवादीच्या महिलांनी शहर पोलीस स्टेशनला दीड तास ठिय्या दिला होता. यासंदर्भात संध्याकाळी देवा सोनारवर गुन्हा दाखल करण्यात आला़या प्रकरणातील तक्रारदार व संशयित हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमधील आहेत. देवा सोनार हा या पक्षाचे नगरसेवक तथा मनपा स्थायी समितीचे माजी सभापती चंद्रकांत सोनार यांचा मुलगा आहे. बोला धुळेकर विचार मांडा-3 या व्हॉट्सअप ग्रुपवर विविध पक्ष, विचारसरणीच्या लोकांची सामाजिक विषयावर चर्चा घडवून आणली जाते. 22 एप्रिल रोजी रात्री अशीच चर्चा सुरू असताना देवा याने जयश्री अहिरराव यांची बदनामी होईल अशी पोस्ट आणि त्यावर ईल व बदनामीकारक टिप्पणी टाकली. त्याला विरोध करणा:या ग्रुपच्या एका सदस्याला धमकावल्याचीही तक्रार आहे. गुंडप्रवृत्तीच्या या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करून संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना माजी महापौर जयश्री अहिरराव, महापौर कल्पना महाले, प्रा. सुवर्णा शिंदे, ज्योती पावरा, स्थायी समिती सभापती कैलास चौधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज मोरे, कमलाकर अहिरराव तसेच मीनल पाटील, मंगला मोरे, नगरसेविका कल्पना बोरसे, माधुरी अजळकर, चंद्रकला जाधव, कशीश उदासी, माधुरी बडगुजर, शशिकला नवले, अवंता माळी, कलाबाई बडगुजर, भारती अहिरराव व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या़शिंदखेडय़ातही निवेदनसदर घटनेच्या निषेधार्थ शिंदखेडा येथील महिलांनी पोलीस अधीक्षक चैतन्या एस़ यांना निवेदन सादर केल़े माजी महापौर जयश्री अहिरराव व भारती मोरे यांची सोशल मिडीयावर बदनामी करणा:या देवा सोनारवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली़ यावेळी छाया पवार, नगरपंचायत सभापती सुषमा चौधरी, प्रिती शाह, उज्वला मेखे, मनिषा पाटील, नलिनी वेताळे, मिना चौधरी उपस्थित होत्या़देवाची गुन्हेगारी पाश्र्वभूमी देवा हा गुंड प्रवृत्तीचा असून त्यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रय}ाचा गुन्हाही दाखल असून हद्दपारीची कारवाई केली आहे. यापूवीर्ही त्याने नगरसेविका ललिता आघाव यांच्या घरावर हल्ला करून मारहाण केली होती. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनाही धमकी दिली होती. पोलीस कर्मचा:यावरही हल्ला करण्याचा प्रय} केला होता.
माजी महापौरांसह महिलांचा शहर पोलीस ठाण्यात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2017 11:35 PM