चंद्रकांत सोनार ।धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात अन्य पक्षापेक्षा भाजपकडे तिकिटासाठी इच्छुकांची गर्दी जास्त आहे. सर्वांचे लक्ष आता भाजप - सेना युतीकडे लागले आहे. मतदारसंघात माजी आमदारांसोबतच इच्छुकांची भाऊगर्दी आहे.भाजप - सेना युतीत सुरुवातीपासूनच धुळे शहर मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळत आली आहे. परंतू गेल्या निवडणुकीत युती न झाल्याने दोन्ही पक्षाने स्वतंत्र उमेदवारी केली होती. त्यात भाजपतर्फे आमदार अनिल गोटे निवडून आले होते. यंदा युती झाली तर ही जागा शिवसेनेला सुटेल की सिटींग आमदार असल्याने भाजपला सुटेल याबाबत सद्या चर्चा सुरु आहे. दुसरीकडे राष्टÑवादी व काँग्रेस आघाडीत ही जागा राष्टÑवादीला सुटेत. गेल्या वेळेस आघाडी न झाल्यामुळे दोन्ही पक्षाने स्वतंत्रपणे लढविली होती. या दोन्ही पक्षांना पराभव पत्कारावा लागला होता.यंदा आघाडीत ही जागा कोणाला सुटेल याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच आघाडीसोबत जर वंचित आघाडी आली तर मग त्यांच्याकडून या जागेवर आपला हक्क सांगितला जाऊ शकतो. त्यामुळे आघाडीत ही जागा कोणाला सुटेल यावर पुढील राजकीय गणित निश्चित होणार आहे.दुसरीकडे कॉग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री अमरिशभाई पटेल आणि त्यांचे कट्टर समर्थक राष्टÑवादीचे राजवर्धन कदमबांडे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे़ त्यामुळे काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या समर्थक दुविधा मनस्थितीत दिसून येत आहे.दोघे दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यास कॉग्रेस-राष्ट्रवादीला मोठा हादरा बसु शकतो़ त्यानंतर आघाडीकडून आणि युतीकडून याठिकाणी कोण उमेदवार होऊ शकतो, हा देखील प्रश्न सद्या आघाडीच्या नेते व नागरिकांना पडला आहे. एकूणच याचे उत्तर उमेदवारी माघारीनंतरच स्पष्ट्र होऊ शकते़ याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे़कदमबांडे विरूध्द गोटेंचा सामना :सतत तीन वेळा धुळे विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले माजी आमदार अनिल गोटे यांनी गेल्यावेळेस भाजपकडून उमेदवारी करीत विजय मिळविला होता. धुळे शहर विधानसभा मतदारसंघ म्हटला केली माजी आमदार अनिल गोटे आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची लढत हे समीकरणच बनले आहे. सातत्याने हे दोघी नेते एकमेकाविरोधात लढत आहे. या दोघांमधील सामना दरवेळीस रंगतदार ठरतो. यंदा हे दोघामधील पुन्हा सामना होईल का, हा देखील धुळेकरांच्या दृष्टीने उत्सुकतेचा विषय आहे. कारण या दोघांपैकी कदमबांडे यांनी आपण मैदानात असल्याचे सांगितले असले तरी गोटे यांनी मात्र अद्याप निवडणुकीसंदर्भात स्पष्ट सांगितले नाही.शिवसेनेची लागणार कसोटी :महापालिका निवडणूकीत भाजपाने एकहाती सत्ता मिळवित मनपावर सत्ता काबीज केली़ तर शिवसेनेला मात्र एकच जागेवर समाधान मानावे लागले होते़ यामुळे मध्यतंरी शिवसेना व भाजपामध्ये वाद चांगलाच चव्हाट्यावर येवून आरोप आरोप प्रत्यारोप देखील झाले होते़ त्यामुळे लोकसभा निवडणूकीत भाजपा मित्र पक्षाविरूध्द शिवसेनेच्या काही नेत्यांनी आमदार कुणाल पाटील यांचा खुलेआम प्रचार करूनही भाजपाचा उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाला़ भाजपासाठी शहर विधानसभेसाठी पोषक वातावरण असतांना एैनवेळी शिवसेनेला जागा मिळाल्यास भाजप-सेनेची अंतर्गत कसोटी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही़अन्यथा, बदलू शकतात समिकरणे :भाजप-सेना याची युती होईल अशी दोन्ही पक्षातील नेत्यांना अपेक्षा आहे. मात्र जागा वाटपाच्या मुद्यावरून वरिष्ठ पातळीवरूनच युती फिस्कटल्यास दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढू शकतात. त्यामुळे या मतदार संघातील समिकरणे मोठ्या प्रमाणात बदलतील असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे.अनेकांची नावे आघाडीवर :धुळे शहर मतदार संघातून अनेक इच्छूकांनी डोक्याला बाशिंग बाधून बसले आहे़ नेमकी उमेदवारी कोणाला मिळू शकते़ याबाबत अद्याप कोळ गुलदस्त्यात आहे़ सध्या इच्छूकामध्ये धुळे शहरात भाजप- सेना युतीकडे इच्छुकांची गर्दी आहे. त्यात भाजपतर्फे महानगर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल, डॉ.माधुरी बोरसे , हर्षल विभांडीक, रवी बेलपाठक, विनोद मोराणकर तर शिवसेनेतर्फे प्रा.शरद पाटील, महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, सतीश महाले, डॉ.सुशील महाजन यांच्या नावाची चर्चा आहे.
Vidhan Sabha 2019 : माजी आमदारांसोबतच इच्छुकांची भाऊगर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:50 PM
धुळे शहर विधानसभा : युतीबाबत अनिश्चितता, आघाडीत पक्षप्रवेशाची चर्चा, बॅनरबाजीद्वारे प्रचार
ठळक मुद्देशिवसेनेची लागणार कसोटी अन्यथा, बदलू शकतात समिकरणे अनेकांची नावे आघाडीवर कदमबांडे विरूध्द गोटेंचा सामना :