लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री तालुक्यातील पिंपळनेर पैकी शिरवाड गावात शेतीच्या वादातून माजी सरपंच श्रीराम वसंत सोनवणे यांची त्यांचेच लहान भाऊ सुदाम सोनवणे यांनी पोटात चाकू भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गावातील बस स्थानकाजवळ घडली. पोलिसांनी संशयित आरोपी सुदाम सोनवणे यास ताब्यात घेतले आहे.पिंपळनेर पैकी शिरवाडे गावाचे माजी सरपंच श्रीराम वसंत सोनवणे आणि त्यांचे लहान बंधू सुदाम सोनवणे यांच्या सकाळी आठ वाजेच्या सुमारास गावातील बस स्थानक परिसरात शेतीच्या वादातून शाब्दीक चकमक उडाली. यावेळी सुदाम यानी चाकूने माजी सरपंच श्रीराम सोनवणे यांच्या पोटात वार केले. दोन ते तीन वेळा त्यांनी चाकू भोसकला. त्यामुळे श्रीराम सोनवणे जागीच खाली पडले. वार केल्यानंतर सुदाम तेथून फरार झाला. नंतर ग्रामस्थांनी श्रीराम यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पिंपळनेर स्टेशन गाठले आणि संशयित आरोपीस ताबडतोब अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने संशयित आरोपी सुदाम यास अटक करुन पोलीस स्टेशनला आणले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी उशीरापर्यंत सुरु होते.
शेतीच्या वादातून भावाने केला माजी सरपंचाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:19 PM
साक्री तालुक्यातील पिंपळनेर पैकी शिरवाडे गावातील घटना
ठळक मुद्देदोघ भावांमध्ये शेतीच्या वादावरून झाली शाब्दीक चकमकसुदामने चाकूने माजी सरपंच श्रीराम सोनवणेच्या पोटात वार केलेपोलिसांच्या पथकाने संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.