शिरपूर : तालुक्यातील विखरण येथील साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक प्रल्हाद डी.सोनार यांनी आपल्या घरी फळ्यावर रंगीत खडूंच्या माध्यमातून श्री चित्रगणेश चित्रित केले आहे.पर्यावरण रक्षणासाठी, प्रदूषण रोखण्याची अत्यावश्यक गरज आहे. त्यासाठी प्लास्टिक, थर्माकोलपासून होणारे प्रदूषण टाळले पाहिजे. त्याच बरोबर सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारात आलेल्या प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळेही प्रदुर्षणात दरवर्षी वाढ होत असते. शाडू माती हा पर्यायही तेवढाच घातक आहे. कारण शाडू माती तयार करतांना वापरलेल्या रसायनांमुळे शाडू मातीचा थरसुद्धा साध्या मातीत एकरुप होत नाही. यासाठी गाळाची माती वापरून गणेशमुर्ती तयार करणे हा पर्याय योग्य आहे.परंतु विखरण येथील कलाशिक्षक प्रल्हाद सोनार यांनी आपल्या घरी फळ्यावर रंगीत खडूंच्या माध्यमातून श्री चित्रगणेश चित्रित केला आहे़ त्यासाठी त्यांना सलग सात तास फलक लेखन करुन चित्र साकारले. रंगीत खडूंमुळे कोणतेही नुकसान होत नाही. शंभर टक्के प्रदुर्षण मुक्त गणरायाची निर्मिती करुन आपल्या घरी स्थापना केली आहे. त्यामुळे एक वेगळा मार्ग त्यांनी भाविकांसाठी दाखविलेला आहे. आपणही घरी फलकावर, कागदावर किंवा कापडावर असेच चित्रण करुन जरगणेशाची स्थापना केली तर पर्यावरण सांभाळण्यासाठी प्रत्येकाची मदत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ा
कलाशिक्षकाने केली चित्रगणेशाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 11:48 AM