ऑनलाईन लोकमत
साक्री,दि.17 - एकाच रात्री चोरटय़ाने साक्रीतील चार दुकाने फोडून हजारोंचा मुद्देमाल लंपास झाल्यामुळे व्यापा:यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आह़े चोरटय़ांनी कपडे व रोख रक्कम गायब केली आहे.
साक्री शहरातील शेतकी संघ येथील शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये नितीन दत्तात्रय निकम यांचे टेलरींगचे दुकान आह़े चोरटय़ांनी या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला़ शिऊन तयार असलेल्या 150 शर्ट आणि पॅन्ट चोरटय़ाने लांबविल्या़ तसेच शाळकरी मुलांचे तयार असलेले गणवेशही लंपास केल़े यानंतर चोरटे शासकीय दूध डेअरीजवळील दुकानांकडे आल़े कन्हैय्या वेल्डींग दुकान, मनोज ऑटो गॅरेज आणि भारत मेन्स पार्लर या दुकानांमध्ये चोरी केली़ गॅरेजमधून 6 ऑईलचे डबे, मेन्स पार्लर दुकानाच्या गल्ल्यातून 1 हजार 200 रुपयांची रोकड असा मुद्देमाल लंपास केला़