आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार चार शिक्षकांना जाहीर झाले आहे. पुरस्कार वितरण ५ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शिक्षकदिनी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात येते.गुरूवारी सायंकाळी पुरस्कारर्थींच्या नावे जाहीर करण्यात आली. यात राजेंद्र विक्रम भामरे (जि.प.शाळा दह्याने, ता. धुळे), पावबा धनजी बच्छाव (जि.प.शाळा वाजदरे, ता. साक्री), गोकूळ पोपटराव पाटील (जि.प. शाळा, चुडाणे, ता. शिंदखेडा), व वासुदेव रामदास चाचरे (जि.प. शाळा बभळाज,ता. शिरपूर) यंचा समावेश आहे.आज पुरस्कार वितरणजिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, जि.प. धुळे येथे होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.असतील. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी असतील. उपस्थितीचे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे, निरंतरचे शिक्षणाधिकारी नरेंद्र खंडारे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी केले आहे.
धुळे जिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 11:24 AM