लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळील बिजासन पोलिस चौकीजवळ एका अज्ञात वाहनाने काकोटी प्रजातीच्या कोल्ह्यास धडक देवून जखमी केले होते़ मात्र त्यास अधिक उपचारासाठी मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथे प्राणी सश्रुषा केंद्र व पुनर्वसन केंद्र येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. गेल्या आठवड्यात पळासनेर गावाजवळ एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत काकोटी प्रजातीचा कोल्ह्यास धडक दिली होती. त्यात तो कोल्हा गंभीर जखमी (कमरेस जबर दुखापत) झाला होता़ त्या वन्यप्राण्याला त्वरित सातपुडा वन्यजीव संरक्षण समितीचे अध्यक्ष लकी जगदेव, अरविंद जमादार व अंकित जैन यांनी वनविभागाच्या मदतीने डॉ.सईद मनेर, डॉ.कुवर, प्राणीमित्र दिनेश तिवारी व उत्कर्ष जैन यांच्याकडे उपचारासाठी घेऊन गेले़ नंतर त्या वन्यप्राण्यांचा पुढील उपचार सांगवी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ़सईद यांचे मार्फत लकी जगदेव यांच्याकडे सुरू होते. परंतु कोल्ह्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यास अधिक उपचारासाठी मुंबई येथे नेण्याचे ठरविण्यात आले़ २८ रोजी जखमी कोल्ह्याची वैद्यकीय तपासणी डॉ़सईद यांनी केली. तो पुढील प्रवासासाठी तंदुरुस्त असल्याने त्यास मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे प्राणी शुश्रुषा केंद्र व पुनर्वसन केंद्र येथे रवाना करण्यात आले़ यावेळी सांगवी वन विभागाचे वनक्षेत्रपाल डी.एम. शरमाळे, वनपाल सांगवी डी.आर. जिरे, वनरक्षक एस.बी.इंडे, जी.एस. बारीस, वनमजुर भोजु पावरा तसेच सातपुडा वन्यजीव संरक्षण समिती पळासनेर येथील अध्यक्ष प्राणीमित्र लकी जगदेव, अरविंद जमादार, अंकित जैन, महेंद्र कोळी, विकास जगदेव, सनी महाले, निशिगंध पवार, मयुर जाधव, प्रमोद शिरसाठ आदी उपस्थित होते. वाहनाने दिलेल्या धडकेत कोल्हा गंभीर जखमी झाला होता, स्थानिक उपचार करूनही प्रकृती सुधारत नसल्यामुळे अधिक उपचारासाठी मुंबईला पिंजरा गाडीत नेवून प्राणी शुश्रुषा केंद्रात ३० रोजी स्वत: नेले़ त्यानंतर त्यास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले जाणार आहे़-डी़एम़ शरमाळेवनक्षेत्रपाल, सांगवी
वाहनाच्या धडकेत कोल्हा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 10:32 PM