ऑनलाईन लोकमत
न्याहळोद,दि.2 : येथील शेतक:यांनी उत्पादित केलेला भाजीपाला अन्यत्र विक्रीस न नेता गावातच त्याचे मोफत वाटप करुन शेतक:यांच्या संपाला पाठिंबा आपला पाठिंबा दिला आहे. अमित पवार यांनी या निर्णयासाठी पुढाकार घेत मोठय़ा कष्टाने पिकविलेला भाजीपाला फेकून न देता तो गावातील गरजूंनाच मोफत स्वरुपात दिला. आता गावातील भाजीपालाही विक्रीसाठी बाहेर जाणार नाही. तसेच भाजीपाला विक्रीवाचून खराब न होता गरजूंना त्याचा लाभ मिळणार आहे. याशिवाय गावातील दूधही बाहेर न पाठविता गावातच ते मोफत वाटप करण्यात आले.