धुळे :कोरोनामुळे लॉकडाउन झाले आणि हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे जेवणाचे हाल होऊ लागले. त्यांना जीवनावश्यक वस्तूही मिळेनास्या झाल्या होत्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आर्ट आॅफ लिव्हींग परीवार मदतीसाठी पुढे सरसावला असून परीवाराच्या सदस्यांकडून दररोज १०० कुटूंबाना जेवण देण्यात येते आहे. तसेच शिधा वाटप केले जात आहे.मोहाडी परिसरातील झोपडपट्टी भागात दररोज खिचडी शिजवून वाटप केली जात आहे. लॉकडाउन झाल्यानंतर काही दिवसांत आर्ट आॅफ लिव्हींगने सदस्यांना गरजू व्यक्तींसाठी त्यांच्या घरून डबे आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र त्यात वेगवेगळे पदार्थ येत असल्यामुळे गरजूंना वाटप करण्यास अडचण येत होती. त्यामुळे सदस्यांकडून किराणा माल मागवण्यात येऊ लागला व शहरातील विविध झोपडपट्टी भागात खिचडी शिजवून वाटप करण्यात येत आहे. तसेच फुड पॉकेट्सचेही वाटप करण्यात येत आहे. तुरीची दाळ, तांदुळ, गहू, साखर, चहा पावडर आदी वस्तू असलेले फुड पॉकेट्सचे गरजूंना वाटप करण्यात येत आहे.पोलिसांचीही काळजीकोरोनामुळे लॉकडाउन झाले आहे. पोलिस मात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिसांचीही काळजी आर्ट आॅफ लिव्हींगचे सदस्य घेत आहेत. पोलिसांना वेळोवेळी पाणी बॉटल्स, बिस्कीटे व फुड पॉकेट्स देण्यात येत आहेत. हा उपक्रम दिलीप कुटे, सतिष लोहालेकर, मंजुषा लोहालेकर, रमेश पाटिल, किशोर वाणी, प्रतिभा अलई, सचिन लोंढे आदी सदस्य राबवित आहेत़
दररोज शंभर गरजू कुटूंबाला मोफत जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 10:13 PM