धुळे : शहरातील नकाणे रोडवर असलेल्या गट नं़158/3 मधील शासकीय जागेत 755 विद्यार्थी क्षमतेचे आदिवासी विद्याथ्र्याचे वसतिगृह उभारण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू होता़ मात्र अखेर ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असून प्रस्तावित वसतिगृहासाठी जागा देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी काढले आहेत़ ‘ जिल्हाधिका:यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यापूर्वी आदिवासी प्रकल्प कार्यालयाला दिले होत़े त्यात नियोजित प्रकल्प अहवाल, मागणी केलेल्या जागेचा चालू महिन्याचा सातबारा उतारा, भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी नकाशा, जागेचा वापर, अतिक्रमण, न्यायालयीन प्रकरण इत्यादीबाबत मंडळाधिकारी यांचा स्थळ निरीक्षण अहवाल, नकाशा व कार्यालयाचे साक्षांकन, शासकीय प्रकरणासाठी जागा आवश्यक असल्याचा मागणी अहवाल, ग्रामसभेचा ना हरकत ठराव व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची शिफारस, पथकिनारवर्ती नियमानुसार जागा बांधकाम योग्य आहे काय? याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभिप्राय, जागा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आहे काय? याबाबत पाटबंधारे विभागाचा अभिप्राय व चालू वर्षाचे अकृषिक मूल्यांकन आदी कागदपत्रांचा समावेश होता़ सर्व आवश्यक ती कागदपत्रे संकलित करताना आदिवासी प्रकल्प विभागाची चांगलीच दमछाक झाली़ प्रस्तावित जागेत आदिवासी प्रकल्प कार्यालय व वसतिगृह उभारले जाणार आह़े आदिवासी प्रकल्प कार्यालयाने नकाणे रोडवरील जागेत आदिवासी विद्याथ्र्याचे वसतिगृह उभारण्यासाठी शासकीय जागा मिळावी, यासाठी जिल्हाधिका:यांना प्रस्ताव सादर केलेला होता़ त्यानुषंगाने तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी चौकशी करून सदरची एक हेक्टर 49 आर जागा देण्यास हरकत नसल्याचा अहवाल दिला होता़ त्याचप्रमाणे शासनाने देखील 4 मार्च 2010 च्या शासन निर्णयानुसार या वसतिगृहाला प्रशासकीय मान्यता दिली होती़ नकाणे ग्रामपंचायतीचा ठरावही पुढील कार्यवाहीस्तव प्राप्त झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागानेही ही जागा बांधकाम करण्यास योग्य असल्याचे स्पष्ट केले आह़े पाटबंधारे विभागाने याबाबत दिलेल्या अभिप्रायानुसार सदरचे क्षेत्र कोणत्याही प्रकल्पाच्या लाभदायक किंवा बुडीत क्षेत्रात येत नसल्याचे म्हटले आह़े तसेच मागणी क्षेत्र हे पांझरा नदी व लोंढा नाल्यालगत असून पूरनियंत्रण रेषेच्या 0़60 वर आह़े या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात यावी, असे अभिप्रायात नमूद करण्यात आले आह़े सर्व कागदपत्रांची योग्य पद्धतीने पूर्तता विलंबाने का होईना, करण्यात आली असल्याने विविध अटी व शर्तीना अधीन राहून जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी जागा आदिवासी विभागाला विनामूल्य प्रदान करण्यात येत असल्याचे आदेश काढले आहेत़ केवळ चार वसतिगृह जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी धुळे शहरात येत असतात़ मात्र शहरात विद्याथ्र्यासाठी केवळ चार शासकीय आदिवासी वसतिगृह उपलब्ध असून तेदेखील भाडे तत्त्वावरील इमारतीत आहेत़ सध्या अस्तित्वात असलेल्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रोफेसर कॉलनी (75 विद्यार्थी क्षमता), प्रभातनगर (75), दत्त मंदिर (75) आणि विटाभट्टी परिसर (105) या वसतिगृहांचा समावेश आह़े
आदिवासी वसतिगृहाचा मार्ग मोकळा!
By admin | Published: January 25, 2016 12:30 AM