लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शुक्रवारी आणखी २०८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये, धुळे तालुक्यातील वार येथील ५३ वर्षीय पुरुष तसेच धुळे शहरातील ६४ वर्षीय पुरुष व ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.शुक्रवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ८५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील ४३, शिंदखेडा तालुक्यातील ६७ व शिरपूर तालुक्यातील १३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ५२१६ वर पोहोचली आहे.
शुक्रवारी २०८ अहवाल पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 9:10 PM