येथे राष्ट्रीयीकृत बँकेची एकमेव शाखा आहे. या बँकेला परिसरातील दहापेक्षा जास्त खेडी जोडली असल्यामुळे बँकेच्या सभासदांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे या बँकेत ग्राहकांची सतत वर्दळ असते. शिवाय कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे या बँकेत कधीही वेळेवर पासबुक भरून मिळत नाही. अनेकदा प्रिंटर खराब असल्याचे निमित्त पुढे केले जाते. त्यामुळे असंख्य ग्राहकांना व्यवहार पडताळणीसाठी विलंब होतो. तसेच खातेही वेळेवर ओपन होत नाही. त्यामुळे बँकेच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी बँकेत गर्दी करू नये म्हणून चक्क बँकेचे गेट बंद करून ग्राहकांना बाहेर उभे केले जाते. खिडकीतून व्यवहार सुरू होतो. मात्र, एकच खिडकी व गर्दी जास्त, त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडतोच, शिवाय भर उन्हात बँकेबाहेर ताटकळत उभे राहावे लागते. बाहेर कोणतीही बैठक व्यवस्था नाही. पाण्याचीदेखील व्यवस्था नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी बँकेच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
म्हसदी सेंट्रल बँकेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:39 AM