लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेने मोठा गाजा-वाजा करत सुरु केलेल्या इंग्रजी शाळा आता शेवटच्या घटका मोजत असल्याचे प्रतिबिंब सोमवारी महापालिकेत उमटले़ इंग्रजी शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी महापौरांचे दालन गाठले़ वेतन मिळत नसल्याची कैफियत शिक्षकांनी महापौरांकडे मांडली़ त्यावर आपली बाजू मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविली जाईल असे महापौर चंद्रकांत सोनार यांनी सांगितले़ महापालिकेच्या कारभारामुळे इंग्रजी माध्यमामध्ये शिकणाºया गोरगरीबांच्या मुलांचे भवितव्य अंधकारमय होणार आहे़ मंजुरीचा आदेश नसल्यामुळे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ इंग्रजी माध्यमांच्या ३, ९, १४, २५ या क्रमांकाच्या शाळेत इंग्रजी माध्यम शिकविले जाते़ गेल्या दोन वर्षात या इंग्रजी शाळांच्या मंजुरी आदेशाबाबत महापालिकेने कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली दिसत नाही़ त्यामुळे कर्मचाºयांसह शिक्षकांना वेतनापासून वंचित रहावे लागत आहे़ त्यामुळे महादेव पदेशी आणि माजी नगरसेविका मायादेवी परदेशी यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाºयांसह पालक, आणि विद्यार्थ्यांनी महापौर चंद्रकांत सोनार यांच्याकडे धाव घेतली़ याप्रकरणात तातडीने उच्चस्तरीय पातळीवर तातडीने योग्य तो निर्णय घेण्यात यावा, इंग्रजी शाळांना पुर्ववत मंजुरीचे आदेश देण्यात यावे, शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी महापौरांकडे लावून धरली़ यावेळी विजय शेलार, गजेंद्र जाधव, शांताराम बोरसे, बलराम फुलपगारे, संजय चव्हाण, विजय चौधरी, विक्रम फुलपगारे आदी उपस्थित होते़ महापौरांच्या दालनाबाहेर किलबिलइंग्रजी माध्यमांची शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना पालक, शाळेचे शिक्षक, कर्मचारी हे काही राजकीय पदाधिकाºयांच्या माध्यमातून महापौरांच्या दालनात आक्रमकपणे चर्चा करत होते़ त्याचवेळेस ही इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील चिमुकल्यांचा महापौर दालनाबाहेर किलबिलाट सुरु होता़ हा प्रकार बहुधा पहिल्यांदाच झाला़इंग्रजी माध्यमांच्या शाळेची निर्माण झालेली समस्या समजून घेतली आहे़ हा प्रश्न डॉ़ सुभाष भामरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविला जाईल़- चंद्रकांत सोनार, महापौर
धुळे मनपा इंग्रजी शाळांचे भवितव्य अंधारातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:43 PM