लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अतिसंवेदनशिल भाग म्हणून आजही गजानन कॉलनी परिसराकडे पाहण्यात येते़ ही निर्माण झालेली ओळख पुसून टाकण्याची जबाबदारी या भागातील नागरिकांची आहे़ येथे तयार झालेली पोलीस चौकी दोन समाजात समन्वय घडविण्याचे काम निश्चित करेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी व्यक्त केला़ गजानन कॉलनीत नव्याने तयार झालेल्या पोलीस चौकीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते़ शहरातील गजानन कॉलनी भागात मागील काही वर्षापूर्वी झालेली दंगल लक्षात घेता पोलीस चौकी तयार झाली होती़ दरम्यानच्या काळात पुन्हा या भागात तणाव निर्माण झाल्याने या चौकीचे गजानन कॉलनीत स्थलांतर करण्यात आले़ यावेळी अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव, गुन्हे अन्वेषण शाखेचे उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, धुळे शहर निरीक्षक दिलीप गांगुर्डे, देवपूरचे निरीक्षक आनंद निकम, चाळीसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांच्यासह माजी महापौर जयश्री अहिरराव, कमलाकर अहिरराव, प्रदीप कर्पे, महेश मिस्तरी, भुपेंद्र लहामगे, शरद वराडे, भिकन वराडे, शव्वाल अन्सारी व नागरिक उपस्थित होते़ नव्याने तयार झालेली ही चौकी या भागात सेतू म्हणून काम करेल, असा विश्वास पानसरे यांनी व्यक्त केला.
धुळ्यात गजानन कॉलनी पोलीस चौकीचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 10:39 PM
पोलीसच समन्वय घडविणार : उदघाटनप्रसंगी एम.रामकुमार
ठळक मुद्देपोलीस चौकीचे नव्या जागेत स्थलांतरअत्याधुनिक यंत्रणाने सुसज्ज चौकीपोलीस अधिकारींसह राजकीय पदाधिकारी, नागरिक उपस्थित