लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील गजानन कॉलनी, अरिहंत मंगल कार्यालय परिसरात बुधवारी रात्री दोन समुदायात तणाव निर्माण होऊन दगडफेकीची घटना घडली होती़ परिस्थिती नियंत्रणात असलीतरी तणाव कायम आहे़ परिणामी पोलिसांचा बंदोबस्त या भागात कायम ठेवण्यात आलेला आहे़ दरम्यान, या भागातील पोलीस चौकीचे स्थलांतर तणावग्रस्त भागात करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत़ घटनास्थळी दगडांचा खचशहरातील ८० फुटी रोडवरील अरिहंत मंगल कार्यालय, गजानन कॉलनी भागात किरकोळ कारणावरुन दोन समुदायात दंगल उसळली़ काय होत आहे, हे समजण्याच्या आत एकमेकांवर दगड भिरकाविण्यात आल्यामुळे परिस्थिती देखील गंभीर झाली होती़ आरडा-ओरड होत असताना घोषणाबाजीही करण्यात आल्याने अधिकच तणाव वाढला होता़ घटनास्थळी दगडांचा खच पडलेला होता़ घटनास्थळी तातडीने पोलीस अधीक्षक यांच्यासह अन्य अधिकारी पोलीस फौजफाट्यासह दाखल झाला होता़ सोशल मिडीयावर ‘वॉच’!घटनेचे गांभिर्य लक्षात घेता अफवा कोणीही पसरु नये़ यासाठी सोशल मिडीयावर पोलिसांची नजर आहे़ याकामी सायबर सेल सतर्क असून घटनेवर आणि सोशल मिडीयावर लक्ष ठेवून आहे़ कोणी अफवा पसरविताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी दिला आहे़ वरिष्ठांची घटनास्थळी भेटनाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी तातडीने गुरुवारी सकाळी धुळ्यात येवून घटनास्थळी भेट दिली होती़ त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात येवून त्यांनी पोलीस अधिकाºयांना मार्गदर्शक सूचनाही केल्या़ नव्याने पोलीस चौकीनागरिकांना संरक्षण देण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्याकडे केली होती़ पोलीस चौकी या ठिकाणी असलीतरी ती लांब आहे़ म्हणून ज्या ठिकाणी तणाव कायम असतो त्याच जागेवर चौकी नव्याने उभारण्यात येणार असल्याचे सुतोवाच देण्यात आले आहे़ त्यामुळे या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत़