धुळे : शिरपूर तालुक्यातील पळासनेर शिवारातील चारणपाडा गावाच्या एका नाल्याशेजारी जुगार खेळतांना सांगवी पोलिसांनी धाड टाकून सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोकड ४१ हजारांसह चारचाकी २ वाहने, ४ दुचाकी असा एकूण १२ लाख ७१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली.
सांगवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना एका गुप्त बातमीद्वारामार्फत चारणपाडा गावाच्या एका नाल्याच्या पलीकडे काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती दिली. त्यामुळे शिरसाठ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली शासकीय पोलीस गाडी एका हॉटेलवर उभी करून नाल्याच्या काठावरून पोलीस पायी-पायी जात असताना काही अंतरावर चारचाकी व दुचाकी वाहने उभी असल्याचे दिसले पुढे गेल्यावर काटेरी झुडपाच्या आडोशात काही लोक जुगाराचा खेळ खेळताना आढळले. पोलिसांनी आठ जणांकडून ४१ हजारांची रोख रक्कम तसेच २ चारचाकी गाड्या, ४ दुचाकी गाड्या असा एकूण १२ ला ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पो.ना. प्रवीण धनगर यांना दिलेल्या फिर्यादीवरून सांगवी पोलिसांत आठ जणांविरोधात जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पो.स.इ. भिकाजी पाटील हे करीत आहेत.