आॅनलाइन लोकमतधुळे - शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत व थाळनेर पोलिसांनी संयुक्तपणे सरजई पेट्रोलपंपाच्या मागे जुगार अड्डयावर धाड टाकून ९ दुचाकी, २२ मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४३ हजाराचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी २५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई १८ रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास करण्यात आली.थाळनेर येथे जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शिरपूर व थाळनेर पोलिसांनी मध्यरात्री या जुगार अड्डयावर धाड टाकली. त्यांच्याजवळून २२ मोबाईल, ९ दुचाकी व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४३ हजार ६७० रूपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत टाकणे, रवींद्र पवार, बागले, मुकेश पावरा, खलाणे, चालक शिरसाठ, रवींद्र पाटील, शेखर बागूल यांच्या पथकाने केली. या प्रकरणी हवालदार रवींद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून थाळनेर पोलीस स्टेशनला २५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना नोटीस देवून सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडालेली आहे.
थाळनेर येथे जुगार अड्डयावर धाड, साडेतीन लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 4:00 PM
२५ जणांवर गुन्हा दाखल, कारवाईमुळे खळबळ
ठळक मुद्देपोलिसांनी पहाटेच्या सुमारास केली कारवाई २५ जणांना घेतले ताब्यातदुचाकी, मोबाईल, रोख रक्कम जप्त