लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मूर्तिकारांचे गणेश मूर्ती रंगविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर शहरासह जिल्हाभरातून मूर्तींची नोंदणी काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक महिन्यापूर्वीच करून ठेवल्याने तयार गणेश मूर्ती काही गणेश भक्त आतापासूनच नेताना दिसत आहेत. दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी येणाºया पोळा सणानिमित्तही बाजारपेठेत खरेदीसाठी शेतकºयांची रविवारी गर्दी दिसून आली. गेल्या दोन दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने पोळा सणानिमित्त लागणाºया वस्तू खरेदी करताना शेतकºयांमध्ये उत्साह दिसत आहे. लाडक्या गणरायाचे २५ आॅगस्टला आगमन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मोहाडी परिसर, साक्री रोड, पारोळा रोड, नगावबारी परिसरातील मूर्तिकार गणेश मूर्तींना रंग देण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत. दरम्यान, धुळे शहरातील पाचकंदील परिसर ते फुलवाला चौकापर्यंत सजावटीसाठी लागणाºया साहित्यांचीही दुकाने विक्रेत्यांनी थाटली असून अनेक भाविक आतापासूनच खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहेत. ३० टक्के मूर्ती महागणार जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू झाला. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्ती ३० टक्क्यांनी महागणार आहेत, अशी माहिती मूर्तिकार अनिल पवार, संतोष चौधरी, किरण पाटील यांनी दिली. जीएसटीमुळे गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे रंग, माती व इतर साहित्यांच्या किमती यंदा वाढल्या आहेत. हे साहित्य बाहेरून आयात करावे लागते. त्यासाठी यंदा जादा पैसे गणेश मूर्ती तयार करणाºया मूर्तिकारांना मोजावे लागले. परिणामी, यंदा गणेश मूर्तींच्या किमती वाढतील, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.वस्तू खरेदीसाठी शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पोळा सणही अवघ्या दोन आठवड्यांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकºयांची बाजारपेठेत वस्तू खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. त्यात गेले वर्षभर कांद्याचे दर कोसळलेले असताना दोन दिवसांपासून कांद्याला अपेक्षित भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदी झाला असून, शेतकरी मोठ्या उत्साहात वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. धुळे शहरातील पाचकंदील परिसरात पोळा सणासाठी लागणारे नाथ, दोर, गोंडा, मोरखी, पैंजण, जोतर, गजरा, बाशिंग आदी साहित्य विक्रीची दुकाने थाटली आहे. वस्तू खरेदीसाठी शेतकºयांचा उत्साह दिसत असल्याची माहिती विक्रेते हेमंत अग्रवाल यांनी दिली आहे.
गणेश मूर्ती रंगविण्याचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 9:14 PM
बाजारपेठेत चैतन्य : पोळा सणानिमित्त वस्तू खरेदीसाठी शेतकºयांचा उत्साह; तयार गणेश मूर्ती नेण्यास सुरुवात
ठळक मुद्देगेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. अद्याप आमच्या परिसरात समाधानकारक पाऊस नाही. आम्ही पावसाच्या प्रतीक्षेत आहोत. वर्षातून आमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पोळा सणानिमित्त आम्ही खरेदीसाठी बाजारपेठेत आलो आहोत. -सीताराम वाणी, शेतकपारोळा रोड व मोहाडी परिसरात गणेश मूर्ती तयार करणाºया कारखान्यात आतापर्यंत तयार झालेल्या गणेश मूर्ती नंदुरबार, शहादा, जळगाव जिल्ह्यातील रावेर, अमळनेर, चोपडा, पारोळा या ठिकाणी विक्रीसाठी रवाना झाल्याची माहिती तेथील विक्रेत्यांनी दिली आहे.धुळे शहरात विविध मंडळांचे कार्यकर्ते वर्गणी गोळा करण्यासाठी घरोघरी, परिसरातील दुकाने, कार्यालयांमध्ये जाताना दिसत आहे. तसेच गणेशोत्सवाच्या काळात प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीनेही अनेक मंडळांचे कार्यकर्ते प्रयत्नशील असून, जुने धुळे भागातील काहीशहरातील इंदिरा गार्डन परिसरात प्रिन्स मित्र मंडळाने गेल्या महिन्यातच ‘आतुरता आगमनाची’ असा फलक लावला होता. त्यानंतर याच परिसरातील वंदे मातरम् प्रतिष्ठानच्या सदस्यांनी लाडक्या बाप्पाचे आगमन लवकरच होणार, असा फलक लावला असून त्या फलकातून ‘स्वच्छ भारत’चा संदेश