लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेने कचरा संकलनाचा ठेका दिलेल्या ठेकेदाराकडून घंटागाडी चालक व सफाई कामगारांचे वेतन पाच महिन्यांपासून देण्यात आलेले नाही़ त्यामुळे सोमवारी घंटागाड्या चालकांनी पांझरा चौपाटीवर कामबंद आंदोलन केले़महापालिकेने शहरात कचरा संकलनाचा ठेका दिला असून ठेकेदारांनी कचरा संकलन करण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहे़ मात्र गेल्या पाच महिन्यांपासून संबंधित कर्मचाºयांना वेतन मिळालेले नाही़ त्यामुळे सोमवारी संबंधित कर्मचाºयांनी सोमवारी पांझरा चौपाटीवर घंटागाड्या लावत कामबंद आंदोलन केले़ तोपर्यंत वेतन मिळत नाही, तोपर्यंत कामबंद ठेवणार असल्याचे कर्मचाºयांनी स्पष्ट केले़ त्यानंतर सायंकाळी संबंधित कर्मचाºयांनी मनपा उपायुक्तांची भेट घेऊन चर्चा केली़ यावेळी गजेंद्र बिºहाडे, कुणाल लंगोटे, नरेंद्र माधवे, दिलीप अकवारे, मोहन लोणारी, रहिम पटेल, अरबाज शेख रशीद, गौतम चव्हाण, असराल शेख, आकाश दामोदर, आवेश पठाण, रवि कांबळे, योगेश सोनवणे, अकिल शेख, शेख समद, इकबाल शेख व कर्मचारी सहभागी झाले होते़
धुळयात कचरा संकलन ठेकेदाराच्या कामगाराचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 7:15 PM
पांझरा चौपाटीवर लावल्या घंटागाड्या, उपायुक्तांची घेतली भेट
ठळक मुद्दे- शहरात कचरा संकलनाचा बोजवारा- बिले निघत नसल्याचे कारण ठेकेदार देतो- वेतन मिळेपर्यंत कामबंदचा निर्धार