धुळे : वरखेडी रोडवरील कचरा डेपोचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असला तरी महापालिका प्रशासनाने अखेर हा प्रश्न हाताळण्यास सुरुवात केली आह़े याठिकाणी 70 वर्षापासून साचलेल्या कच:याची विल्हेवाट लावून उद्यान निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली़शहरातून दररोज संकलित केला जाणारा कचरा वरखेडी रोडवरील कचरा डेपोमध्ये टाकला जातो़ परंतु या कचरा डेपोची क्षमता पूर्ण झाल्याने कचरा संकलित केल्यानंतर तो डेपोबाहेरील रस्त्यावरच टाकला जात होता़ त्यामुळे परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरल्याने नागरिकांकडून सातत्याने कचरा डेपो स्थलांतरित करण्याची मागणी होत होती़शहरातील वरखेडी रोडवर 10 एकर विस्तीर्ण जागेत 70 वर्षापूर्वी कचरा डेपो तयार करण्यात आला आह़े नगरपालिका असताना तयार करण्यात आलेला हा डेपो महानगरपालिका होऊन बारा वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही कायम आह़े या ठिकाणी वर्षानुवर्षापासून टाकण्यात येत असलेला कचरा आजच्या स्थितीत नेमका किती असावा हे सांगणेदेखील अवघड आह़े स्वच्छतेमुळे वाढला ताणमहापालिकेकडून सध्या 70 घंटागाडय़ा व ट्रॅक्टरच्या माध्यमातून कचरा संकलन होत असून दररोज 125 ते 150 मेट्रिक टन कचरा संकलित होतो़ परंतु या कच:यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणताही प्रकल्प नाही़ कच:याचे व्यवस्थापन करण्यासाठी यंत्रणा नाही़ त्यामुळे संकलित झालेला कचरा कचरा डेपोवर टाकला जातो़ स्वच्छ महाराष्ट्र अभियानामुळे मनपाकडून स्वच्छतेवर भर दिला जाऊ लागल्याने नियमित संकलित होणा:या कच:याचे प्रमाणदेखील वाढले आह़े अनेक संस्थांशी चर्चा; पण़़़कचरा डेपोतील कच:याची विल्हेवाट लावण्याबाबत मनपाने आतार्पयत अनेक संस्थांशी चर्चा केली़ मात्र त्यासाठी येणारा खर्च किमान चार कोटींपेक्षा अधिक असल्याने प्रशासनाने स्वत:च हा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू केले आह़े डेपोतील कच:याचे ढीग बनवून त्याची विल्हेवाट लावली जाणार आह़े त्यासाठी प्रथम कच:यातून प्लॅस्टिक वेगळे केले जाईल़ त्यानंतर याठिकाणी उद्यान निर्मिती केली जाणार आह़ेदरम्यान, धुळे मनपाला आतार्पयत पाचवेळा राज्यात यश मिळाले आह़े यापुढील टप्प्यात स्वच्छता व कचरा संकलन आणि प्रक्रियेचा प्रश्न मार्गी लावून त्यातही यश मिळविण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आल़ेवैयक्तिक शौचालयांच्या आकडेवारीत सप्टेबर व ऑक्टोबर महिन्यात महापालिकेला प्रथम क्रमांक मिळाला़4क्षयरोगाच्या कामकाजात प्रथम क्रमांक मिळाला़4नोटाबंदीच्या निर्णयानंतर करसंकलनात मनपा ‘ड’ वर्गात राज्यात प्रथम़4राज्यात सर्वाधिक अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई धुळे महापालिका क्षेत्रात करण्यात आली़4हगणदरीमुक्तीत राज्यात चौथा क्रमांक मिळाला़
कचरा डेपोचे सपाटीकरण सुरू!
By admin | Published: January 25, 2017 12:21 AM