ऑनलाईन लोकमत धुळे, दि.26 - गुड्डया खून प्रकरणी धुळे पोलिसांनी बुधवारी पहाटे आणखी दोन संशयित आरोपींना दोंडाईचा येथे अटक केली. त्यामुळे या प्रकरणी अटक झालेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे. भिमा देवरे व योगेश जगताप अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.त्यांना गोपनीय माहितीच्या आधारे दोंडाईचा चौफुली येथे पहाटे अटक करण्यात आली. भिमा देवरे हा मुख्य आरोपी भद्रा देवरे याचा भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी या खून प्रकरणी पोलिसांनी सागर साहेबराव पवार उर्फ कट्टी आणि अभय उर्फ दादू देवरे या दोघांना अटक केली आहे. सध्या ते दोघे पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांकडून मुख्य आरोपींसंदर्भात माहिती मिळविण्यासाठी चौकशीकामी चौघांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील तिघांना मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले होते. त्यात योगेश रोशनलाल जयस्वाल, प्रकाश देवचंद मोरे व महेंद्र यशवंत खैरनार यांचा समावेश असून त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुड्डया खून प्रकरणातील दोन संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 4:19 PM
धुळे पोलिसांनी केली दोंडाईचा येथे पहाटे कारवाई
ठळक मुद्देधुळे पोलिसांनी केले दोंडाईचा येथे पहाटे कारवाई.खून प्रकरणातील अन्य दोघे पोलीस कोठडीतमंगळवारी रात्री तिघांना घेतले चौकशीसाठी ताब्यातसंशयितांना आज न्यायालयात हजर करणार