शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

गावठाणच्या जागेवरून बाभळे-वाघाडीची ग्रामसभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:03 PM

शाब्दीक वादाचे रूपांतर झाले हाणामारीत, पोलीस बंदोबस्त

आॅनलाइन लोकमतसोनगीर (जि.धुळे) :बाभळे-वाघाडी (ता.शिंदखेडा) ग्रुपग्रामपंचायतीची प्रजासत्ताक दिनी रद्द झालेली सभा बुधवारी घेण्यात आली. या ग्रामसभेत गावठाण जागेवर अतिक्रमण असल्याचे सांगता दोन गटांत जोरदार शाब्दिक चकमक झाली. शाब्दीक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रसंगी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन्ही गटाकडून एकमेका विरोधात आरोप-प्रत्यारोप झाल्याने या भागात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते.बाभळे व वाघाडी खुर्द गृप ग्रामपंचायतीची वाघाडी येथे प्रजासत्ताकदिनी ग्रामसभा घेतली होती. मात्र कोरम पूर्ण नसल्याने, त्यादिवशी ग्रामसभा रद्द करण्यात आली. रद्द झालेली ग्रामसभा बुधवारी पुन्हा ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आली. ग्रामसभेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्या परवानगीने ग्रामसेवक पी. डी बोरसे यांनी ग्रामसभेला सुरुवात केली.गावाच्या विकासासाठी ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा होत त्यास मंजुरी देण्यात आली. गावेळी बाभळे येथील राजेंद्र पंडित पाटील यांनी बाभळे गावातील गावठाण हद्दीतील अतिक्रमणे हटविण्यात यावीत यासाठी तक्रार अर्ज सादर केला. आलेल्या अर्ज सवार्नुमते मंजूर केला. गावठाणला लागून लखन रूपनर यांचा गट आहे. ग्रामपंचायतीने गावठाण हद्द कायम करण्यासाठी भुमी अभिलेख विभागाने हद्द नेमून दिली. परंतु खाजगी जागेत गावठाण जागा निघत असल्याने वादग्रस्त ठरली आहे. ग्रामसभेत जागेवरून दोन्ही गटात शाब्दिक चकमक होत गोंधळ उडाला. ग्रामसभेत धक्काबुक्कीचा प्रकार घडला. पोलिसांनी दोन्ही गटातील जमावाला आवर घातला. वाघाडी येथून जमाव बाभळे गावात गेला असता, त्याठिकाणी दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.यावेळी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच भरत पाटील, ग्रामपंचायतसदस्य नाना जामू भिल, हिरकनबाई छगन भिल, सुनंदाबाई अभिमन ठाकरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे