धुळे : अहिराणी भाषेला अधिकृत प्रमाण भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र या संघटनेने केली आहे़संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़ त्यात म्हटले आहे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अहिराणी भाषा अध्ययन केंद्र सुरू करावे व अहिराणी भाषेचा स्वतंत्र अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करावा, खान्देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये अहिराणी मातृभाषेत प्राथमिक शिक्षण द्यावे, नवीन शैक्षणिक धोरणात मराठी, इंग्रजी माध्यमाच्या सर्वच शाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणात अहिराणी भाषा हा विषय सक्तीचा करावा, जनगणना करताना मातृभाषेचा स्वतंत्र रकाना टाकून अहिराणी भाषिकांची देखील गणना करावी, अहिराणी भाषा साहित्य संमेलन आणि पुस्तकांसाठी निधीची तरतूद करावी, अक्षय तृतीया, आखाजीच्या दिवसाला अहिराणी दिवस म्हणून मान्यता द्यावी, यासह इतर माण्या निवेदनात केल्या आहेत़अभ्यासक्रमात अहिराणी भाषेचा समावेश केल्यास खान्देशातील मुलांना अभ्यासाची गोडी लागून विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी होईल अशी आशा व्यक्त केली आहे़निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष प्रा़ सदाशिव सूर्यवंशी, सचिव रमेश बोरसे, प्रा़ रमेश राठोड, गोकुळ पाटील, प्रा़ अशोक शिंदे, शाहिर नानाभाऊ पाटील, संजय धनगव्हाळ, पंकज पाटील, खान जुनैद, शरद भामरे, शशिकांत देसले, रफीक कुरेशी, राजेंद्र पाटील, प्रशांत वानखेडे, दिपक देवरे, कन्नोर सतिलाल, चेतन भदाणे, गणेश महिरे, राधेकृष्ण पाटील, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, अमोल देवरे, प्रविण साळुंके, राहुल पाटील, मयुरी पाटील, ज्ञानेश्वर वाघ आदींच्या सह्या आहेत़
अहिराणीला भाषेचा दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 10:20 PM