लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा क्रमांक तीन मध्ये असलेल्या शेतकºयांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा; या मागणीसाठी शिंदखेडा तालुक्यातील गोराणे, मेलाणे, माळीच जातोडा येथील ग्रामस्थांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना नुकतेच निवेदन दिले. दरम्यान, या मागणीसाठी गुरुवार, १५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. नरडाणा औद्योगिक क्षेत्रातील टप्पा क्रमांक तीन मध्ये मौजे गोराणे, मेलाणे, माळीच, जातोडा येथील ६६७.२१ हेक्टर क्षेत्रात असलेल्या खासगी जमिन अधिग्रहीत करण्यासाठी महाराष्टÑ औद्योगिक विकास अधिनियमानुसार २९ नोव्हेंबर २०१२ रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. या क्षेत्रात नरडाणा ग्रोथ सेंटर या नावाने औद्योगिक वसाहत विकसित होणार आहे. नरडाणा औद्योगिक वसताहतीचा विचार केला तर टप्पा क्रमांक १ व २ मध्ये काही उद्योग सुरू झाले आहेत. त्यानंतर येथील क्षेत्रात अनेक भूखंड वाटप झाले. मात्र, प्रत्यक्षात उद्योग सुरू झालेले नाही. अशी परिस्थिती असताना शेतकºयांच्या मालकीच्या जमिनीवर नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा क्रमांक ३ मध्ये गोराणे, मेलाणे, माळीच, जातोडा परिसरातील ६६७.२१ हेक्टर आर जमीन अधिग्रहीत करण्याचे शासनाने सूचित केले होते. योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकºयांच्या संघर्ष जमीन अधिग्रहीत करण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली. त्यानंतर प्रशासकीय व शासकीय पातळीवर अनेक बैठका झाल्या. या बैठकीत प्रति हेक्टरी शेतकºयांना तीन लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते. परंतु, या क्षेत्रातील बहुतांश जमीन ही महामार्गाला लागून आहे. त्यामुळे शेतकºयांनी त्यांच्या शेत जमिनीला प्रति हेक्टरी ५० लाख रुपये द्यावे, अशी मागणी गेल्या सात वर्षांपासून शासनाकडे लावून धरली आहे. परंतु, अद्याप प्रश्न सुटलेला नसल्याची माहिती गोराणे येथील शेतकरी अनिल भामरे यांनी दिली. पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने शेतकरी त्रस्त शेतकºयांच्या शेतजमिनीला योग्य मोबदल्यासोबत शेतकºयांच्या सातबाºयावर महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाचा शिक्का लावण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले असून शेतकºयांना त्यांची जमीन विकणे देखील मुश्लिक होऊन बसले असून बॅँकाही कर्जपुरावठ येथील शेतकºयांना करीत नसल्यामुळे शेतक ºयांची कोंडी झाली आहे. सामूदायिक आत्महत्त्येचा इशारानरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा क्रमांक ३ मध्ये ६६७.२१ हेक्टर क्षेत्रात सुमारे २०० शेतकºयांची शेत जमीन आहे. या शेतकºयांच्या शेत जमीनीला योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दोंडाईचा दौºयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल आले असता त्यांना शेतकºयांनी सर्व कागदपत्रे दाखविली. शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. परंतु, तरीही शेतकºयांचा प्रश्न सुटलेला नाही. यापूर्वी शेतकºयांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनाही निवेदन दिले होते. परंतु, प्रश्न सुटत नसल्याने शेतकºयांनी मंगळवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना निवेदन दिले. दहा दिवसाच्या आत शेतकºयांच्या जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्यास सामूदायिक आत्महत्या करणार असा इशारा शेतकºयांनी निवेदनात दिला आहे. हे निवेदन मंत्री देसाई यांच्या मुंबईस्थीत निवासस्थानी देण्यात आले. त्यावेळी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, शेतकरी राजेंद्र पाटील, अनिल भामरे (गोराणे), मनोहर पाटील (नरडाणा), सरपंच वसंत देसले (माळीच), जिजाबराव पाटील (नरडाणा), सुधाकर पाटील (मेलाणे) आदी उपस्थित होते.
नरडाणा औद्योगिक क्षेत्रातील जमिनीला योग्य मोबदला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 3:22 PM
मागणी : उद्योग मंत्र्यांना निवेदन; १५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
ठळक मुद्देदरम्यान, न्यायासाठी शिंदखेडा तालुक्यातील मौजे गोराणे, मेलाणे, माळीच, जातोडा येथील ग्रामस्थांचे गुरुवार, १५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनप्रसंगी शेतकºयांच्या जमिनीला प्रति हेक्टरी ५० लाख द्या, अन्यथा इच्छामरणास परवानगी द्या, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात येणार आहे.हे आंदोलन माजी आमदार प्रा. शरद पाटील व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल.