शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

कृषी विकास दरात ५ टक्के वाढीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 9:38 AM

धुळे जिल्हा : पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत कृषी विभागाची माहिती 

ठळक मुद्देअपेक्षित ५ टक्के विकासदरासाठी अन्नधान्य, भाजीपाला व फळपिकांची उत्पादकता वाढविण्याचे उद्दिष्टविविध पिकांसाठी ४८ हजार ९७० क्विंटल बियाणे, सुधारित व बिटी कापसाच्या ८.४० लाख पाकिटांची मागणीशेतक-यांना दर्जेदार कृषी निविष्ठा व सुरळीत कर्जवाटपाचे निर्देश 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : यंदाच्या खरीप हंगामात कृषी विकासाचा दर ५ टक्क्याने वाढविण्यावर भर दिला असून त्यासाठी अन्नधान्य पिकांची उत्पादकता १० टक्के तर भाजीपाला, फळपिकांची उत्पादकता ७ टक्के वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती खरीप हंगाम पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत कृषी विभागातर्फे देण्यात आली. शेतक-यांना पीक कर्जाचा पतपुरवठा सुरळीत व वेळेवर होण्यासाठी संबंधित बँकांनी काळजी घेण्याबरोबरच, शेतकरी खाजगी सावकाराकडे वळणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. दर्जेदार खते व बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका-यांना दिल्या.राज्याचे ग्राम विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन सभागृहात शनिवारी सकाळी ही बैठक पार पडली. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, कृषी संचालक कार्यालयात नाशिक येथील सामेती प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, प्रांत गणेश मिसाळ, तंत्र अधिकारी विनय बोरसे, अमृत पवार आदी उपस्थित होते. बैठकीस  धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे एकमेव लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल व जिल्ह्यातील अन्य आमदार या बैठकीस अनुपस्थित होते.  यावेळी कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामाकरिता केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आरंभी कृषी विभागाने तयार केलेल्या कापसावरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन विषयक घडीपत्रिका, भित्तीपत्रिका व जलदर्शिका २०१८ चे अनावरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. गतवर्षी खरीप व रब्बी हंगाम मिळून १ हजार ८० कोटी रुपये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र त्या तुलनेत केवळ २९३ कोटी २७ लाख रुपये पीक कर्जाचे वितरण झाले. त्याची टक्केवारी अवघी २७ टक्के आहे, अशी माहिती अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर यांनी दिली. त्यामुळे यंदा कृषी पीक कर्ज वाटपासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. हवामान खात्याने यावर्षी पावसाळा समाधानकारक असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यंदा १ हजार १७६ कोटी रु. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून शेतकºयांना विनासायास कर्ज कसे मिळेल, असे नियोजन करण्याचे तसेच ते त्यासाठी खासगी सावकारांकडे वळणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शासनामार्फत राबविण्यात येणा-या स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी करून जनजागृती करावी, अशी सूचना आमदार कुणाल पाटील यांनी केली.  शेतक-यांना देण्यात येणारे अर्थ सहाय्य हे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतक-यांनी आपल्या बँक खात्याशी आधार लिकींग करून घ्यावेत, असे आवाहनही पालकमंत्री भुसे यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश सांगळे यांनी मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन केले. उपविभागीय कृषी अधिकारी पी.एम. सोनवणे यांनी आभार मानले. या बैठकीला कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ४.४० लाख हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट यंदा खरीप पेरणीसाठी ४.४० लाख हेक्टर क्षेत्राचे लक्षांक निश्चित केला आहे. प्रमुख पिकांखेरीज सरासरीच्या तुलनेत मका व सोयाबीन पिकांच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. विविध पिकांच्या ४८ हजार ९७० क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविली आहे. कापसाच्या सुधारित वाणाची १ कोटी ७५  लाख पाकिटे व बी.टी. कापसाच्या ६.६५ लाख पाकिटांच्या पुरवठ्याचे नियोजन केले आहे. १ लाख २ हजार ७१० मे.टन खत पुरवठ्याचे आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर असून मागील शिल्लक ८८४२ मे.टन साठ्यासह एकूण १ लाख ११ हजार ५५२ मे.टन खते खरीपासाठी उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी दिली.

 

टॅग्स :Dhuleधुळेcollectorतहसीलदार