लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत दुसºया दिवशी धुळ्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट डावपेच टाकत, स्पर्धेवर आपली छाप सोडली. यात ४२ किलोवजन गटात ग्रीकरोमन प्रकारात जगदीश रोकडे याने सुवर्ण तर याच गटातील फ्रीस्टाईल प्रकारात निखील माळी याने रौप्य पदक प्राप्त करून दिले. धुळ्याच्या खेळाडूंकडे लक्षबुधवारी जगदीश रोकडे व निखील माळी यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केल्याने, दोघांच्याही कुस्ती सामन्याकडे धुळेवासियांचे लक्ष लागलेले होते.आज सकाळी ग्रीकरोमन गटात जगदीश रोकडे (धुळे, महाराष्ट्र ) विरूद्ध सुरज.एस (कर्नाटक) यांच्यात अंतिम सामना झाला. ही लढाई अत्यंत चुरशीची झाली. मध्यंतरापर्यंत दोघांनाही दोन-दोन असे समान गुण होते. त्यानंतरच्यावेळेत जगदीशने डाव टाकत एक गुणाची कमाई करून, विजय मिळवित महाराष्ट्रला सुवर्णपदक प्राप्त करून दिले. जगदीशने विजय मिळविताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. यानंतर ४२ किलो वजन गटातच निखील माळी (धुळे, महाराष्ट्र) व विशांत जे.सिंग (दिल्ली) यांच्यात चुरशीचा सामना झाला. दुसºया व तिसºया फेरीत निखील माळीने प्रतिस्पर्ध्याला अवघ्या २५ व १५ सेकंदात पराभूत केल्याने, त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु अंतिम सामन्यात दिल्लीचा विशांत सिंग वरचढ ठरला. त्याने निखीलचा पराभव केला. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. निखीलने रौप्य मिळविताच अनेकांनी त्याचे कौतुक केले, काहींनी बक्षीसेही दिली.दुसरा दिवस धुळ्याच्या जगदीश रोकडे व निखील माळी यांनी गाजवून सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई केली.
राष्ट्रीय शालेय कुस्तीस्पर्धेत धुळ्याच्या खेळाडूंनी मिळविले सुवर्ण, रौप्य पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:28 PM
पदक मिळविताच अनेकांनी केला जल्लोष, खेळाडूंचे कौतुक
ठळक मुद्देधुळेकर खेळाडूंची कुस्ती बघण्यासाठी झाली होती गर्दीजगदीश रोकडेने कर्नाटकच्या सुरज.एस.चा केला पराभवनिखील माळीचा दिल्लीच्या खेळाडूकडून पराभव