आॅनलाईन न्यूज नेटवर्कसोनगीर : सर्वत्र पावसाने हुलकावणी दिल्याने पाणी टंचाईसह दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. गुरूवारी त्याचा परिणाम येथील आठवडे बाजारावरही दिसून आला. स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे गृहिणींचे ‘किचन बजेट’ पार कोलमडले. सध्या परिसरात विहिरींची जलपातळी खोल गेल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट झाली असून अन्य ठिकाणांहून भाजीपाला येथे विक्रीसाठी येत आहे.सध्या वाल, शेवगा, टोमॅटो व कोथिंबीरची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. पाणीटंचाईमुळे दिवसेंदिवस भाजीपाल्यांचे भाव वाढत आहे. काही भाज्यांचे दर प्रतिकिलो १२० ते १३० रुपये तर काही भाज्या ७० ते ८० रुपय कि.ग्रॅ. दराने किरकोळ विक्री होत आहे. त्यात वाल, शेवगा, टोमॅटो प्रत्येकी १०० ते १२० रु. किलोच्या दराने विकली जात आहे. तर वांगी, कारली, भेंडी, दुधी भोपळा, गिलके, मेथी, पालक आदी भाज्या ७० ते ८० रुपये किलोच्या दराने विक्री केली जात आहे. कोथींबिर ही सर्वाधिक २८० ते ३०० रुपये किलो च्या दराने विक्री केली जात आहे. तर सध्या फक्त बटाटे स्वस्त म्हणजे २० रुपये कि.ग्रॅ.दराने विक्री होत आहेत.पाऊस नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विहिरींची पातळी खालावल्याने तर काही विहिरी कोरड्या पडल्याने भाजीपाला उत्पादनात मोठी घट झाली आहे. पाऊस नसल्याचा थेट परिणाम भाजी व्यवसायावर दिसून येत आहे. किरकोळ दुकानदार व्यापाºयांकडून भाजीपाला माल विक्रीसाठी घेतात. मात्र भाव वाढल्याने भाजीपाला घेण्यासाठी ग्राहक तयार नाही. परिणामी भाजी सडत असल्याने ती फेकण्याशिवाय विक्रेत्याकडे पर्याय नसतो. यामुळे किरकोळ दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी १५० रुपयांत पिशवी भरून भाजीपाला येत होता. मात्र आता ३०० रुपय जरी बाजारात नेले तरी घरी एक रुपया शिल्लक येत नाही, असा अनुभव काहींना येत आहे. दरम्यान गेल्या दोन आठवड्यापासून भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिपाली जैन यांनी यांनी सांगितले.पाऊस नसल्याने तसेच विहिरी कोरडया पडल्याने स्थानिक शेतक?्याचा शेतात भाजी पाला पिकवला जात नाहीय. या मुळे सध्या येथील बाजार पेठेत अन्य ठिकाणा वरून भाजी पाला ठोक विक्रीसाठी येत आहे. गेल्या काही दिवसांपासुन भाजी पाल्याचे दर वधारल्याने गृहिणीची किचन बजेट पार कोलमंडले फक्त बटाट्याचे दर आवाक्यात आहेत. दरम्यान पावसाची अशीच परिस्थिती असली तर आगामी काळात कसे होणार, अशी चिंता नागरिक व्यक्त करीत आहेत.दरम्यान गुरुवारी येथे भरणाºया आठवडे बाजाराला परिसरातील २० ते २५ खेड्यापाड्यातील लोक बाजार करण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तसेच दुष्काळी परिस्थिती असल्याने दुपारच्या वेळेत बाजारात शुकशुकाट दिसून आला. गुरुवार असून देखील पाहिजे त्या प्रमाणात व्यवसाय होत नसल्याचे बºयाच व्यावसायिक, दुकानदारांनी सांगितले.
सोनगीर येथील बाजारावर मंदीचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 5:30 PM