आॅनलाइन लोकमतधुळे : महाराष्टÑ राज्य कला संचालनालय मुबंई यांच्यामार्फत २६ ते २९ सप्टेंबर २०१९ याकालावधीत घेतली जाणारी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. याला परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोेडे व कला संचालक राजीव मिश्रा हेच जबाबदार असून, त्यांना बडतर्फ करावे व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्टÑ राज्य कला शिक्षक महासंघाने केलेली आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा देशात सर्व राज्यांमध्ये एकाचवेळी व एकाच दिवशी घेतली जाते. या परीक्षेसाठी देशातील ७ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बसले आहेत. एक हजार केंद्रावर ही परीक्षा होणार होती. त्यासाठी प्रश्नपत्रिका वितरीत करण्यात आल्या होत्या.कला संचालक व परीक्षा नियंत्रक यांच्या ढिसाळ कारभारामुळे प्रश्नपत्रिकेच्याबाबतीत मुंबईत गोंधळ निर्माण झाल्याचे कारण सांगून तांत्रिक कारण पुढे करीत परीक्षा रद्द करण्यात आल्या. यामुळे विद्यार्थी, पालक व कलाशिक्षक तसेच परीक्षा व्यवस्थापन करणाऱ्या शाळा प्रमुखांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.या सर्व परिस्थितीस कला संचालक राजीव मिश्रा व परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे हेच जबाबदार असल्याने, त्यांना शासनाने बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच तंत्रशिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्टÑ राज्य कलाशिक्षक महासंघाने राज्यपालांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान आता ही परीक्षा दिवाळी नंतर घ्यावी, प्रश्नपत्रिका केंद्रनिहाय पूर्वीप्रमाणेच पाठवाव्या, परीक्षा व्यवस्थापन खर्च विद्यार्थीप्रमाणे फीमधूनच थेट शाळा केंद्राने कपात करून मिळावा. याशिवाय प्रमाणपत्र व दुरूस्त्या विभागीय पातळीवरूनच व्हाव्या अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष विनोद इंगाले, राज्य सरचिटणीस प्रल्हाद साळुंके, राज्य उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे (हस्तेकर), किरण सरोदे, मिलिंद शेलार, राजेश निंबाळकर, विवेक महाजन, नवाब शहा, रमेश तुंगार यांनी केली आहे.
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा ऐनवेळी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:51 AM