धुळे : कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी सरकार सकारात्मक असून याप्रश्नी अधिकारी, लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली जाईल, असे राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी धुळ्यात स्पष्ट केल़े त्याचप्रमाणे शेतकरी कजर्माफी व्हावी, यासाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा सवंग लोकप्रियतेसाठी असल्याची टीकाही त्यांनी केली़राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत सोमवारी धुळे जिल्हा दौ:यावर आले होते. त्यांनी पिंपळनेर येथील शिक्षक सत्कार समारंभाला हजेरी लावली़ त्यानंतर खोत यांचे वाहन अडवून काँग्रेसतर्फे त्यांना निवेदन सादर करण्यात आल़ेपिंपळनेरात कांद्याची बाजारपेठ निर्माण करणारधुळे जिल्ह्यासह पिंपळनेरमध्ये कांद्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात असून लासलगावच्या धर्तीवर पिंपळनेरातही कांद्याची बाजारपेठ निर्माण करण्यासंदर्भात एका आठवडय़ात अहवाल सादर करण्याचे आदेश सदाभाऊ खोत यांनी पिंपळनेर येथे दिल़े मराठा मंगल कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षक विजय भोसले यांच्या सत्कार समारंभाला हजेरी लावली़ पांझरा कान साखर कारखाना सुरू करू, राज्यात 2 हजार 65 हवामान केंद्र सुरू करणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केल़े या कार्यक्रमाला डॉ़ जी़एऩमराठे, बाळासाहेब शिंदे, सुरेंद्र मराठे, अॅड़ गजेंद्र भोसले, सरपंच हाजराबाई पवार, विजय गांगुर्डे, नाना नागरे, हेमंत मदाने, डॉ़विवेकानंद शिंदे, उमाकांत देसले उपस्थित होत़े त्यानंतर सदाभाऊ खोत यांचे वाहन अडवून काँग्रेस पदाधिका:यांनी निवेदन सादर केल़े शेतक:यांना पायाभूत सुविधासाक्री तालुक्यातील देगाव येथील प्रगतशील शेतकरी विनायक अकलाडे यांच्या शेतातील शेडनेटचे उद्घाटनप्रसंगी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भूमिका स्पष्ट केली़ शेतक:यांसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणार असून मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याचे खोत म्हणाल़े देगाव येथील डिजिटल शाळेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आल़े या वेळी सरपंच अक्काबाई बहिरम, उपसरपंच सुधीर अकलाडे, पंचायत समिती सदस्य जगदीश अकलाडे उपस्थित होत़े कृषी विद्यापीठासाठी बैठककृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी सायंकाळी धुळ्यात शिवसेनेचे पदाधिकारी प्रदीप कर्पे यांच्या गोपीनाथ गड या निवासस्थानी भेट दिली़ या वेळी माजी आमदार शरद पाटील यांनी कृषी विद्यापीठाच्या मागणीचे निवेदन त्यांना सादर केल़े कृषी विद्यापीठासाठी सरकार सकारात्मक असून याप्रश्नी लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केल़े त्याचप्रमाणे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात दुस:या टप्प्यात धुळे जिल्ह्याचा समावेश केला जाईल, असेही सदाभाऊ खोत म्हणाल़े या वेळी प्रा़शरद पाटील, प्रदीप कर्पे, हिरामण गवळी, महेश मिस्तरी उपस्थित होत़े तापी योजनेसाठी निधी द्या!शहराला पाणीपुरवठा करणा:या तापी पाणीपुरवठा योजनेवरील पंपसेट बदलविणे व मुख्य जलवाहिनीस ईपॉक्सीपेंट करणे यासाठी 7 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौर कल्पना महाले यांनी सदाभाऊ खोत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली़ बाजार समित्यांमुळे शेतक:यांना लाभ व्हावा यासाठी कायद्यात मोठे बदल करणार असल्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केल़े बाजार समितीत विकास सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी यांना मतांचा अधिकार होता. मात्र आता शेतक:यांना मतदानाचा अधिकार देणार असून शेतक:यांमधूनच सभापती, उपसभापतींची निवड केली जाईल़ शेतीवर आधारित उद्योग, शेतमालावर प्रक्रिया करण्याचे धोरण यापूर्वी कधीही नव्हते, ते धोरणही सरकारने आता तयार केल्याचे ते म्हणाल़े
कृषी विद्यापीठासाठी सरकार सकारात्मक!
By admin | Published: April 11, 2017 12:08 AM