शिरपूर : राजीव गांधी घरकूल प्रकरणातील लाभार्थीचे अनुदान व स्वच्छ भारत मिशनचे अनुदान परस्पर लाटल्याप्रकरणी पंचायत समितीच्या वरिष्ठ व कनिष्ठ सहायकांसह बलकुवे येथील ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, घरकूलप्रकरणी तत्कालीन बीडीओंसह इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिरपूर पंचायत समितीतील वरिष्ठ सहायक दीपक दगडू रणदिवे व कनिष्ठ सहायक प्रीतम साहेबराव देसले यांनी राजीव गांधी क्रमांक 1 मधील घरकूल योजनेत 2014-15 या आर्थिक वर्षात अर्थे बुद्रूक येथील दोन लाभार्थीना घरकूल मंजूर केले. बनावट कागदपत्रांद्वारे त्यांनी लाभार्थीचे प्रत्येकी 95-95 हजार असे एकूण रक्कम 1 लाख 90 हजार रुपये परस्पर काढून घेतले. दुसरीकडे घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थीना लाभ न दिल्यामुळे त्यांनी घरकूल बांधले नाहीत. फौजदारी गुन्हारणदिवे व देसले यांनी घरकूल प्रकरणात अपहार केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. रणदिवे व देसले यांच्यासह दोन बनावट लाभार्थी व तत्कालीन बीडीओ या पाच जणांवर फौजदारी गुन्हा लवकरच दाखल केला जाणार आहे.‘अस्वच्छ’ सेवकबलकुवे ग्रामसेवक राकेश सूर्यवंशी यांनी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत 48 लाभार्थीचे सुमारे 16 लाख रुपयांचे अनुदान परस्पर हडप केल़े त्यांनादेखील निलंबित करण्यात आले आह़े
अनुदान लाटणा:यांच्या दारी निलंबनाची होळी!
By admin | Published: March 11, 2017 12:51 AM