आॅनलाइन लोकमतधुळे- पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजलीसह छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मंगळवारी शहरातून ७२ मीटर लांब,१२ फूट रूंद तिरंग्याची पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रदरम्यान भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषणाने परिसर दणाणुन गेला होता. शहिद अब्दुल हमीद पुतळ्या जवळ शहिंदाना अभिवादन करुन रॅलीचा समारोप झाला.पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहिद झाले.या शहिंदाच्या बलीदानाचे स्मरण करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मंगळवारी शहरातून तिरंगा पदयात्रा रॅलीचे आयोजन केले होते. सकाळी भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय घोषणाने गांधी पुतळापासून पदयात्रेला सुरवात झाली. आग्रारोडवरुन एकाच वेळेस ७२ मिटरचा तिरंगा हाता धरुन शेकडो शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी शिस्तीने चालत असतांना सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. पदयात्रेच्या सुरवातीला भारत मातेच्या वेशभुषेत असलेली तरुणी देखील पदयात्रेचे आकर्षण ठरली. आग्रा रोडवरुन मनोहर चित्रमंदिरा जवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पदयात्रा पोहचल्यानंतर नंतर या ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. तरूणांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणुन गेला होता. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाचे सिनेट सदस्य नितीन ठाकुर अभाविप शहर मंत्री प्रताप श्रीखंडे, डॉ.माधुरी बाफणा, प्रा.नरेंद्र महाल, प्रा. बनवारी शर्मा, महेश निकम आदि उपस्थित होते. महाराजांना अभिवादन केल्या नंतर पदयात्रापुढे मार्गस्थ झाली. तेथुन बारापत्थर, पोलीस मुख्यालय, बसस्थानक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामार्गे ही पदयात्रा शहिद अब्दुल हमीद यांच्या पुतळ्या जवळ पोहचली.या ठिकाणी अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यासह पदयात्रेत सहभागी झालेल्या तरुणांनी शहिदांना अभिवादन केले.पदयात्रेची सांगता जो.रा.सिटी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रगीताने झाली. ७२ मिटरचा ध्वज हातात धरुन शेकडो विद्यार्थ्यांनी अर्ध्या शहराची परिक्रमा केली. या पदयात्रेत न्यु सिटी हायस्कुल,जो.रा.सिटी हायस्कुल,चितळे माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्रसैनिकांचा सहभाग होता.
धुळ्यात ७२ मीटर लांब, १२ फुट रुंद तिरंगा पदयात्रा रॅलीतून शहिदांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 4:43 PM
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अनोखा उपक्रम, हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
ठळक मुद्देतिरंगा रॅलीने वेधले सर्वांचे लक्षशहिंदाना अभिवादन राष्टÑगीताने रॅलीची सांगता