शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

दोंडाईचात किराणा दुकान फोडले ५० हजाराच्या डाळी लांबविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 8:38 PM

शनिवारी पहाटेची घटना : चोरीच्या घटनेमुळे भीतीचे वातावरण

धुळे : बंद दुकानाचा फायदा उचलत चोरट्याने दुकानाचे शटर तोडून चोरट्याने दुकानातील डाळीसह धने आणि जिरे असा एकूण ४८ हजार ९९० रुपये किंमतीचा ऐवज लांबविला़ ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली़दोंडाईचा येथील सिंधी कॉलनीत राहणारे शोभराज भावनदास कुकरेजा (५३) यांचे भावनदास अ‍ॅण्ड लालचंद नावाचे इंदिराचाळ येथे किराणा मालाचे दुकान आहे़ सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे कुकरेजा हे दुपारीच ठरवून दिलेल्या वेळेतच दुकान बंद करुन घराकडे मार्गस्थ होतात़ चोरट्याने देखील हीच संधी साधली़ कुकरेजा नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करुन घरी आले़ चोरट्याने शुक्रवार १५ मे रोजी दुपारी २ ते शनिवार १६ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानाच्या शटरची पट्टी तोडली आणि शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला़ चोरट्याने ३० किलो ग्रॅम वजनाचे ७ कट्टे वजनाची १७ हजार ३२५ रुपये किंमतीची तुरडाळ, ३० किलो ग्रॅम वजनाचे २ कट्टे वजनाची ६ हजार ८५५ रुपये किंमतीची मुगडाळ, ३० किलो ग्रॅम वजनाचे २ कट्टे वजनाची ३ हजार ३०० रुपये किंमतीची चनाडाळ, ३० किलो ग्रॅम वजनाचे ३ कट्टे वजनाची ५ हजार ७६० रुपये किंमतीची धने, २५ किलो ग्रॅम वजनाचे ४ कट्टे १५ हजार ७५० रुपये किंमतीची जिरे असा एकूण ४८ हजार ९९० रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला आहे़ दरम्यान, चोरट्याने गल्ल्यातील रकमेसह कोणत्याही वस्तुला हात लावलेला नाही़नेहमीप्रमाणे कुकरेजा आपले दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर कोणीतरी वाकवून चोरी केल्याचे लक्षात आले़ घटनेचे गांभिर्य ओळखून दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली़ शनिवारी दुपारी याप्रकरणी भादंवि कलम ४५४, ४५७, ४६१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे