ऑनलाईन लोकमत
धुळे ,दि.3 - देशभरात लागू झालेल्या जीएसटी करापोटी सर्व मनपांसह धुळे मनपाला वाढीव अनुदान मिळावे, अशी मागणी महापौर कल्पना महाले यांनी महापौर परिषदेत केली़ मुंबईला शनिवारी महापौर परिषद झाली़ या वेळी राज्यातील सर्व मनपांचे महापौर उपस्थित होत़े
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे अंधेरी येथे शनिवारी सकाळी 11 वाजता महापौर परिषदेची बैठक झाली़ या बैठकीला धुळे मनपा महापौर कल्पना महाले उपस्थित होत्या़ मनपात काम करताना येणा:या अडचणींवर बैठकीत चर्चा झाली़ त्या वेळी जीएसटीपोटी मिळणारे अनुदान वाढीव मिळावे, कर्मचारी भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करावी, महापौर पदाचे अधिकार वाढवावेत, अधिनियमात दुरुस्ती करण्यात यावी, या विषयांवर चर्चा करून तसे ठराव शासनाला महापौर परिषदेतर्फे सादर केले जाणार आहेत़
या वेळी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण, मार्गदर्शक लक्ष्मण लटके यांच्यासह मुंबई, नागपूर, नाशिक, वसई विरार, कल्याण डोंबिवली, अकोला, नगर, पुणे, लातूर, सांगली, मिरज, मीरा-भाईंदर या मनपांचे महापौर उपस्थित होत़े