ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.6 - सरकारने बांधकाम क्षेत्रासाठी लागू केलेला ‘रेरा’ हा नवीन कायदा बांधकाम क्षेत्रातील अनागोंदी रोखणार असून केवळ प्रामाणिक व्यावसायिक या व्यवसायात टिकून राहतील, असे प्रतिपादन नाशिक येथील सीए परेश साबद्रा यांनी केल़े
येथील केड्राई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे बुधवारी रेरा व जीएसटी या कायदा आणि करप्रणालीवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल़े प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाशिक येथील सीए परेश साबद्रा व सीए संकेत शाह, क्रेडाईचे जिल्हाध्यक्ष संजय अहिरराव, सचिव दीपक अहिरे हे उपस्थित होत़े सीए परेश साबद्रा यांनी रेरा (रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट) हा कायदा बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारा आह़े बांधकाम क्षेत्रात कुणीही येऊन अनधिकृत बांधकामे करीत असल्याने हा कायदा लागू करण्यात आला असून त्यामुळे बांधकाम क्षेत्रात भविष्यात प्रामाणिक व्यावसायिकच व्यवसाय करू शकतील़ रेरामुळे सुरुवातीचे काही दिवस संभ्रमावस्था राहणार असली, तरी लवकरच सुटसुटीतपणा दिसून येईल़ रेरा अंतर्गत कोणत्या प्रकल्पांची नोंदणी करावी लागेल व कोणत्या प्रकल्पांची नोंदणी करावी लागणार नाही, याबाबत साबद्रा यांनी मार्गदर्शन केल़े ‘जीएसटी’बाबत संकेत शाह यांनी मार्गदर्शन केल़े जीएसटी ही करप्रणाली अत्यंत सुटसुटीत व लाभदायी आह़े मात्र, या करप्रणालीतून बांधकाम क्षेत्राला होणारा लाभ ग्राहकांना द्यावा लागणार आह़े वास्तविक जीएसटीमुळे बांधकाम क्षेत्राला निश्चितपणे लाभ होईल, पण त्यामोबदल्यात ग्राहकांना पुरवाव्या लागणा:या सुविधांमुळे हा लाभ ग्राहकांच्या पदरी पडणार आह़े जीएसटीची नोंद ठेवताना तारखांचे गांभीर्य पाळावे लागेल़ प्रकल्पाच्या नोंदणीत वेगळी तारीख, जीएसटी नोंद करताना वेगळी तारीख अशाप्रकारचा गोंधळ चालणार नाही़ बांधकाम क्षेत्रात वस्तूंचे दर जीएसटीमुळे बदलणार असल्याने घर, प्लॉट व अन्य सर्व प्रकारच्या मालमत्तेच्या किमतींवर परिणाम होईल, असे शाह यांनी स्पष्ट केल़े