शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

पालकमंत्र्यांनी पकडलेल्या १८ वाळूच्या ट्रकांच्या माहितीचा अहवाल आरटीओकडून मागविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:12 PM

सर्व ट्रक गुजरात पासींगचे : गुजरातमध्ये रॉयल्टी बनवून वाळू आणल्याची कागदपत्रे आढळली

धुळे : पालकमंत्र्यांनी १८ वाळूचे ट्रक पकडल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांकडे तपासणी व चौकशीसाठी पाठविण्यात आले होते़ त्यांची चौकशी आमच्या स्तरावर पूर्ण झाली असून आरटीओ विभागाकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ अहवाल आल्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होईल अशी माहिती ग्रामीण तहसीलदार किशोर कदम यांनी दिली़ हे सर्व ट्रक गुजरात राज्याच्या पासींगचे असून त्यांच्याकडे गुजरातमध्ये रॉयल्टी भरुन तेथूनच वाळू आणल्याची कागदपत्रे आढळून आली.स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार दोन दिवसांच्या जिल्हा दौºयावर आले होते़ शनिवारी सायंकाळी औरंगाबादकडे रवाना होत असताना चाळीसगाव रोडवरील शिरुड चौफुलीवर अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे दिसून आले़ त्यातून पाण्याची गळती होत असल्याचे पालकमंत्र्यांना दिसून आले़ त्यांनी वाहन थांबवून वाहनचालकांची चौकशी केली़ या वाहनचालकांकडे गुजरात राज्यातून वाळू आणल्याची रॉयल्टी मिळून आली़ पालकमंत्र्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना कागदपत्रांची चौकशी करुन दोषींविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़ पालकमंत्र्यांनी वाळूची वाहने पकडल्यामुळे महसूलसह पोलीस यंत्रणा खळबडून जागी झाली़ ग्रामीण तहसीलदार किशोर कदम यांनी तालुका पोलिसांच्या मदतीने ट्रक ताब्यात घेतले आणि एमआयडीसीच्या ट्रक ट्रर्मिनस येथे नेले़ पालकमंत्र्यांच्या कारवाईनंतर वाळू वाहतूक करणाºया वाहनांची धरपकड सुरु झाली असून ठिकठिकाणी ५० हून अधिक वाहने ताब्यात घेण्यात आले आहेत़ पालकमंत्र्यांनी ही वाहने पकडून महसूल यंत्रणेला जागे करण्याचे काम केले आहे़ ग्रामीण तहसीलदारांच्या चौकशीनंतर ही वाहने आता आरटीओ कार्यालयाकडे पुढील चौकशी आणि पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ त्यामुळे पकडण्यात आलेल्या वाहनांपैकी किती वाहनांवर कारवाई होणार, किती वाहनांना अभय मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे़दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत धुळे जिल्ह्यातील वाळू ठेक्यांचा लिलाव झालेला नाही़ यामुळे वाळूचा उपसा आणि वाहतूक केवळ कागदोपत्रीच बंद आहे़ विविध ठिकाणाहून अजूनही चोरटी वाळूची वाहतुक, उपसा सुरुच असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे़ सध्या पावसामुळे नद्यांना पाणी असल्यामुळे वाळूची वाहतूक बंद आहे़ गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वाळूची वाहतूक सुरुच असल्याचे यातून स्पष्ट होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे