लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : रफियोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याचा खून प्रकरणाचा तपास आता ‘विशेष चौकशी समिती’ यांच्यामार्फत सुरु करण्यात आलेली आहे़ स्थानिक पोलीस देखील त्यांना मदत करत असल्याचे पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी सांगितले़ गुड्याचा खून १८ जुलै रोजी सकाळी झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपासाची गती दिली होती़ टप्या-टप्प्याने मुख्य संशयित आणि त्यांना मदत करणारे अशा सुमारे १६ जणांना जेरबंद करण्यात पोलिसांनी यश आले आहे़ अशातच हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रँचकडे सुपुर्द करण्यासंदर्भात चर्चेला उधाण आले होते़ पण, तो निर्णय अद्याप बाकी असलातरी याबाबतच मात्र विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि त्यानुसार पोलीस आयुक्तांना सूचना देण्यात आली़
गुड्या खून प्रकरणाच्या तपासासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे़ कामकाजासाठी समितीचे सदस्य बुधवारी धुळ्यात आलेले नव्हते़ असे असलेतरी समितीचे कामकाज मात्र सुरु झाले आहे़ - एम़ रामकुमारपोलीस अधीक्षक, धुळे