ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 15 - शिरपूर शहरातील चोपडा फाटय़ावर बुधवारी रात्री अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बेकादेशीरपणे गुटख्याची वाहतूक करणा:या कारसह दोघांना पकडल़े कारच्या डीक्कीमध्ये 48 हजारांचा गुटखा आढळून आला़ कारसह 3 लाख 98 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला़ गुटखा सेंधवा येथून भोरटेक (ता़ शिरपूर) येथे नेण्यात येत होता़ त्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना मिळाली होती़ त्यानुसार त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक भास्कर शिंदे, पो़ह़ेकाँ प्रदीप सोनवणे, नितीन पाटील, पो़काँ मुकेश जाधव, समीर पाटील यांनी बुधवारी रात्री शिरपुरात मुंबई- आग्रा महामार्गालगत चोपडा फाटय़ावर कारला (क्ऱ एमएच 18 ए़जे 7512) पकडल़े कारची तपासणी केली असता डीक्कीमध्ये विमल गुटखा व तंबाखुचा साठा आढळून आला़ त्यांची किंमत 48 हजार 787 रूपये आह़े पथकाने कारचालक राजपाल राजेंद्र राजपुत व गणेश दरबारसिंग राजपुत (रा़ भोरखेडा ता़ शिरपूर) यांना ताब्यात घेतल़े तसेच 3 लाख 50 हजार रूपये किंमतीची कार व गुटखा जप्त केला़ तो पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात दिला आह़े
शिरपूर येथे कारमधून 48 हजारांचा गुटाखा जप्त
By admin | Published: June 15, 2017 3:06 PM