धुळे : आझादनगर पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी २९ हजार ५०० रुपये किंमतीचा गुटखा आणि ३० लाखांची लक्झरी असा मुद्देमाल हस्तगत केला़ ही कारवाई गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास गिंदोडिया चौकात लावलेल्या नाकाबंदीत करण्यात आली़ याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले़जीजे २६ टी ८७८७ क्रमांकाची श्रीनाथ ट्रॅव्हल्स नावाची लक्झरी प्रकाश टॉकिजकडून पारोळा चौफुलीकडे जात होती़ याचवेळी आझादनगर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती़ सर्वच वाहनांची तपासणी केली जात असल्यामुळे या लक्झरीची देखील तपासणी करण्यात आली़ यावेळी दोन गोणी आढळून आल्या़ त्यात २९ हजार ५०० रुपये किंमतीचा सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ अर्थात गुटखा मिळून आला़याप्रकरणी आमसिंग सबासिंग राजपुरोहित (३५, रा़ डिंडाली जि़ बाडनेर, राजस्थान) आणि विक्रम सबाजी गयरी (२०, रा़ वेल्हानी ता़ झाडोल जि़ उदयपूर, राजस्थान) यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले़ ही कारवाई एऩ एम़ सहारे, दीपक पाटील, मनोज पाटील, रमेश माळी, रमेश गुरव, दीपक पाटील यांनी केलेली आहे़
धुळ्यात भल्या पहाटे लक्झरीमधून गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 10:48 PM