धुळे : साक्री तालुक्यातील काटवन भागात प्रचंड वादळी वाºयासह गारपीटीने शेतीसह वादळी वाºयाने घरांचे पत्रे तसेच बेहेड येथील इंग्लिश स्कूलचे पत्रे उडून नुकसान झाले आहे़काटवन भागातील अनेक शेतकऱ्यांनी थोड्याफार पाण्यात पिकवलेल्या कांदा चाळीत भरून ठेवला होता परंतु निसगाने तेही हिरावून नेले आहे़ अनेक शेतकºयांच्या कांदाचाळी वादळाने उद्ध्वस्त झाल्या आहे़ तर काही शेतकºयांचा कांदा शेतामध्येच पडला असल्याने संपूर्ण भिजून गेला आहे यामध्ये चारा गहू हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ शेतकºयांनी कर्ज काढून उभारलेल्या शेडनेट ही वादळामध्ये उडून गेले आहेत मोठा खर्च करून शेडनेटमधील लावलेले भाजीपाला पीक हातातून गेले आहे़ साडेचार वाजेच्यावादळी वारा तसेच गारपीटमुळे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे सर्व वर्गखोल्यांचे पत्रे उडून गेले होते़काटवन परिसरात नुकसानसाक्री तालुक्यतील काटवन भागातील दातरती धमणार बेहेड दारखेल विटाई निळगव्हाण छाईल प्र तापुर येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ प्रतापूर येथे विकास सोसायटीच्या गोडाऊनचे पत्रे उडून गेले आहेत़ तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत़ अनेक घरांवर झाडे कोसळल्याने घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़तहसीलदार संदीप भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकसानग्रस्त गावातील शेतकºयांचा शेतीचा पंचनामा करण्यासाठी त्या त्या गावातील संबधित तलाठी यांना पाठवले असल्याचे सांगितले आहे़पिंपळनेर परिसरातजनावरे दगावलीपिंपळनेरसह परिसरात अवकाळी पावसामुळे सामोडे शिवारात संजय रामदास भदाणे यांच्या शेतात काळू आनाजी गोयकर यांच्या मेंढ्या व घोडे बसवले होते़ अचानक विज पडून एक घोडा ठार झाला़ व सामोडे शिवारातील मोहन संपत पवार यांची गाय, वासरू,आणि एक शेळीचे पिल्लू ठार झाले आहे़ या घटनेत सुमारे ३१ हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे़दरम्यान परिसरात झालेल्या जोरदार पाऊसाने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे़खुडाणे येथे गारपीठसाक्री तालुक्यात खुडाणे येथे मंगळवारी दुपारी आलेल्या पावसा सोबत गारपीठ झाली़ त्यामुळे शेतातील उभे कांद्याचे पीकाचे, शिवाय खांडलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. गुरांसाठीचा चारा पावसात भिजला असून तो देखील खराब झाल्याचे पराग माळी यांनी सांगितले.मालपुर येथे मुसळधार पाऊसशिंंदखेडा तालुक्यातील मालपुर परिसरात मंगळवारी पावसाने हजेरी लावली होती़ उघड्यावर पडलेला चारा व काद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ तर विज कोसळल्याने मालपुर येथील भाऊसाहेब पाटील यांची ७० हजार रूपया रूपयांची किंमतीची बैलजोडीवर वीज पडून मृत्यू झाला़ ही घटना मंगळवारी सकाळी शेतावर गेल्यावर माहित पडली़ मोराणे शिवारातील देवमन बापुजी आहिरे याचा शेतातील कांदा पावसाने भिजल्याने पुर्णपणे वाया गेला आहे़ शासनाने कांदा, चारा व बैलजोडीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे़झाडावर वीज पडलीतिसगाव- ढंडाने येथील शेतकरी जगन टिकाराम पाटील यांच्या ढंडाने शिवारात सोमवारी रात्री निबाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाच्या मदोमद दोन तुकडे पडले आहेत़ सकाळी निंबाचे झाड पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती़ दरम्यान वादळी वाºयामुळे गावातील घरांची पडझड झाली आहे़दहिवेल परिसरात पाऊससाक्री तालुक्यातील दहिवेल येथे मंगळवारी झालेल्या पावसात लोणखेडी, डाबरी, ओसपाडा, शिरवाडे, घोडदे, सुरपान आदी गावात गारपीठ झाली़ ऐन कांदा लागवडीच्या काळात अचानक झालेल्या पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाले आहे़ यामुळे ताडपत्री, कागद विक्रीला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे़वर्षी परिसरात पाऊसशिंदखेडा तालुक्यातील वर्षी परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी पाऊस झाला़ त्यात अनेक घरांची पतरे उडाली होती तर विज पुरवठा खंडीत झाला होता़ दरम्यान परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत़बभळाज परिसरात केळीचे नुकसानबभळाज- सोमवारी सायंकाळी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकºयांची तारांबळ उडाली होती़ त्यामुळे शेतकºयांच्या केळीबागाचे नुकसान झाले़ दरम्यान पुन्हा मंगळवारी दाखल वादळी वाºयासह मुसळधार पावसाने केळी, मका, टोमॅटो, भेंडी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ प्रशासनाने तत्काळ पंचनामा करावा अशी मागणी होत आहे़शिरपूर तालुक्यात शेती पिकांचे नुकसानशिरपूरसह तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाºयासह मुसळधार पाऊस झाला़ यामुळे पिकांसह घरांची पडझड झाली आहे़ हिंगोणी येथील मिलिंद पाटील यांच्या घराच्या छताला वीज स्पर्श करत घराच्या मागील बाजूला असलेल्या वीज महामंडळाची डीपी वीज जवळ पडली़ सुर्दवाने काहीही नुकसान झाली नाही़ युवराज जैन यांचा मोर्कट कमिटीच्या शेड मध्ये पडलेला मका वादळी पाऊसाने वाहून गेला. तर मार्केटच्या शेडमधील पोत्यातील माल व धान्य खराब झाले आहे. तर तालुक्यातील जोयदा गावातही वादळी वाºयासह पाऊस झाला.तर वाठोडा गाव मात्र कमी पाऊस झाला आहे़
वादळी वाऱ्यांसह गारपीटीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 2:40 PM